NMC News : महापालिकेला यांत्रिकी झाडू देण्यास केंद्राचा नकार

NMC : स्थानिक पातळीवर यांत्रिकी झाडू उपलब्ध असतानाही महापालिकेच्या यांत्रिकी विभागामार्फत इटलीहून चार झाडू खरेदी करण्यात आल्याने आता महापालिकेला नवीन झाडू खरेदी करता येणार नाही.
NMC Nashik
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : स्थानिक पातळीवर यांत्रिकी झाडू उपलब्ध असतानाही महापालिकेच्या यांत्रिकी विभागामार्फत इटलीहून चार झाडू खरेदी करण्यात आल्याने आता महापालिकेला नवीन झाडू खरेदी करता येणार नाही. केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने यापूर्वी झाडू खरेदी केलेल्या महापालिकांना नव्याने खरेदी न करण्याची सूचना काढली आहे. त्यानुसार आता महापालिकेला नवीन झाडू खरेदीकरिता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (nashik NMC Center refusal to provide mechanical sweeper to Municipal Corporation marathi News )

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेला अनुदान प्राप्त झाले. त्या अनुदानापैकी ३३ कोटींच्या अनुदानातून इटली येथून चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले. एप्रिल २०२३ मध्ये पुरवठादार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. ऑक्टोबरअखेर यांत्रिकी झाडू शहरात दाखल झाले. प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता झाडू प्रत्यक्षात कार्यरत झाले आहे.

यांत्रिकी झाडू खरेदीसाठी प्रत्येकी दोन कोटी सहा लाख रुपये, असे एकूण १२.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पुढील पाच वर्षासाठी देखभाल- दुरुस्ती, मनुष्यबळ पुरविणे तसेच इंधन यावर दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च केले जाणार आहे.  (latest marathi news)

NMC Nashik
NMC News : महापालिका चालविणार 50 इलेक्ट्रिकल बस; डिझेल बस बंद करण्याचे नियोजन

उपयोगाबाबत साशंकता

पाच वर्षासाठी एकूण देखभाल व दुरुस्तीसाठी २१ कोटी आठ लाख रुपयांचा खर्च आहे. अशोकस्तंभ ते गंगापूर गाव, मुंबई नाका ते अशोकस्तंभ, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर, कॅनडा कॉर्नर ते भोसला मिलिटरी हायस्कूल गेट, त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव, गडकरी चौक ते तिडके कॉलनी, चांडक सर्कल ते मुंबई नाका, महात्मा गांधी रस्ता ते मेनरोड, नेहरू गार्डन ते शालिमार, पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा या रस्त्यांची स्वच्छता होणार आहे.

एका यांत्रिकी झाडूमार्फत एका बाजूने वीस किलोमीटर असे दोन्ही बाजू मिळून दररोज ४० किलोमीटर रस्त्यांची झाडलोट केली जाणार आहे. चार वाहनांच्या माध्यमातून एकूण १६० किलोमीटर रस्ते दररोज स्वच्छ केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात यांत्रिकी झाडूचा उपयोग होतो की नाही, याबाबत साशंकता आहे.

यादीतून वगळले

यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून रस्ते झाडलोट करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निधी देण्याऐवजी महापालिकांना केंद्र सरकारकडूनच थेट यांत्रिकी झाडू खरेदी करून दिले जाणार आहे. परंतु ज्या महापालिकांनी यांत्रिकी झाडू खरेदी केले आहे. त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेकडून यापूर्वीच यांत्रिकी झाडू खरेदी झाल्याने नाशिक महापालिकेला वगळण्यात आले आहे.

NMC Nashik
NMC News : जीएसटीतून महापालिकेला अतिरिक्त 102 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.