Nashik NMC News : अधिकाऱ्यांसमोर 4 हजार तक्रारींचे आव्हान! सुटीच्या दिवशीही काम करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

Latest Nashik News : आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आपले सरकार, एनएमसी ई-कनेक्ट ॲपवर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या जवळपास चार हजार २६० तक्रारींचा निपटारा सुटीच्या दोन दिवसात करण्याच्या सूचना दिल्या.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

Nashik NMC News : शहरातील तीनही आमदारांबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आपले सरकार, एनएमसी ई-कनेक्ट ॲपवर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या जवळपास चार हजार २६० तक्रारींचा निपटारा सुटीच्या दोन दिवसात करण्याच्या सूचना दिल्या. (Challenge of 4 thousand complaints before NMC authoritie)

महापालिकेच्या विभागप्रमुखांची शुक्रवारी (ता. २०) बैठक झाली. प्रशासकीय कारकिर्दीमध्ये महापालिकेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात शिथिलता आली आहे. नागरिकांची कामे होण्याऐवजी भूसंपादन व अन्य गैरकारभारामुळे महापालिका चर्चेत आली.

महापालिका प्रशासनावर राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे (शिंदे) वर्चस्व असल्याने भाजपच्या आमदारांची व नगरसेवकांचेदेखील प्रशासनाकडून ऐकून घेतले जात नाही. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहे.

त्याचबरोबर अतिक्रमण व अन्य तक्रारी वाढत असल्याने त्याचा फटका निवडणुकीत भाजपलादेखील बसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपच्या तीनही आमदार नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत आयुक्त करंजकर यांना घेराव घातला.

त्यानंतर आयुक्तांनी रस्त्यावर उतरून अतिक्रमण व रस्त्यांच्या डागडुजी करण्याची सूचना दिली. त्यानंतर यंत्रणा कामाला लागल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. विभागप्रमुखांच्या बैठकीवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसला. बैठकीत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्रलंबित असल्याची बाब समोर आली.

आपले सरकार, पीजी पोर्टल, सचिवालय व एनएमसी ई-कनेक्ट ॲपवर जवळपास चार हजार २६० तक्रारी प्रलंबित असल्याची बाब समोर आली. आयुक्तांनी सदरची बाब गांभीर्याने घेऊन सुट्टीच्या दिवशी तक्रारींचा निपटारा करण्याचा सूचना दिल्या. (latest marathi news)

Nashik NMC
Simhastha Kumbh Mela 2027: त्र्यंबकेश्‍वर कुंभमेळ्याचा आराखडा 503 कोटींचा! मूळ आराखड्याची ‘अ’ अन ‘ब’ वर्गात विभागणी

प्रलंबित तक्रारींचा गोषवारा

आपले सरकार पोर्टल- ४६

पीएम पोर्टल - ५

मुख्यमंत्री कार्यालय - १०

एनएमसी ई-कनेक्ट- ४२००

आयुक्तांच्या सूचना

- सचिवालय, आपले सरकार, पीजी पोर्टल व एनएमसी ॲपवरील प्रलंबित तक्रारींचा निपटारा.

- रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत.

- खड्डे दुरुस्तीसाठी अभियंते व विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी.

- रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे.

- दूषित कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा.

- उद्याने जॉगिंग ट्रॅक व रस्ता दुभाजकामधील गवत व कचरा काढावा.

- मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवावे व स्वच्छता करावी

- डेंगी व इतर साथरोग आटोक्यात आणावे

- शासन योजना वेळेत पूर्ण कराव्यात

- गोदावरी सह उपनद्यांमध्ये कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा

Nashik NMC
Assembly Elections : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर; विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.