Nashik NMC News : सहा दिवसात 8 कोटी वसुलीचे मनपामोर आव्हान!

Nashik News : जीएसटी पाठोपाठ महापालिकेला मालमत्ता कर व त्या खालोखाल नगररचना विभागाच्या विकास शुल्कातून महसुल प्राप्त होतो.
NMC News
NMC Newsesakal
Updated on

नाशिक : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने या कालावधीत विविध कर विभागाला उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी आठ कोटींची रक्कम वसुल करावी लागणार आहे. आतापर्यंत १९२.२० कोटी रुपये वसुल झाले आहेत. (Nashik NMC Challenging to recover 8 crore in six days marathi news)

जीएसटी पाठोपाठ महापालिकेला मालमत्ता कर व त्या खालोखाल नगररचना विभागाच्या विकास शुल्कातून महसुल प्राप्त होतो. नगररचना विभागाकडील विकास शुल्क वसुलीला मर्यादा आल्या आहेत. त्याला कारण म्हणजे मागील दोन वर्षात ऑफलाइन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या आहेत.

त्यामुळे विकास शुल्काची अपेक्षित वसुली झाली नाही. दुसरीकडे मालमत्ता कर यंदा उद्दिष्टापर्यंत पोचताना दिसतं आहे. परंतु शेवटच्या टप्प्यात लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक कामासाठी महापालिकेचा कर्मचारी वर्ग करण्यात आला.

त्यात नगरविकास विभागाकडून करयोग्य मूल्यांचे फेरमूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाढीव कर भरण्यापेक्षा महापालिका काय निर्णय घेते, याकडे मालमत्ता धारकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कर वसुलीवर दिसून येत आहे. (latest marathi news)

NMC News
Nashik NMC News : अतिरिक्त FSI ने नगररचना विभागाला तारले! 241 कोटींचा महसुल जमा

कर समायोजन करण्याचे संकेत आयुक्तांनी दिल्याने मागील काही दिवसात मालमत्ता कर वसुलीत मोठी घट झाली आहे. मार्च संपण्यास सहा दिवस शिल्लक आहे. यंदा २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २०० कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट आहे.

आतापर्यंत १९२.२० कोटी रुपये वसुल झाले आहेत. उर्वरित सहा दिवसांत जवळपास आठ कोटी रुपये वसुल करावे लागणार आहे. त्यात कर उपायुक्तांच्या बदली करण्यात आली, तर २९ ते ३१ मार्च असे सलग तीन दिवस सुटी असल्याने करवसुली करताना मोठी अडचण येणार आहे.

NMC News
Nashik NMC News : पूर्व विभागात सुटीच्या दिवशी 2 लाख 80 हजारांचा भरणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.