NMC Charging Station : चार्जिंग स्टेशन, बस डेपो कामासाठी बंदोबस्ताची मागणी!

Nashik News : इलेक्ट्रिकल बस चार्जिंगचा प्रकल्प अडचणीत आल्याने महापालिकेने तातडीने पोलिस आयुक्तांशी पत्रव्यवहार करून काम पूर्ण करण्यासाठी बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.
charging station
charging station esakal
Updated on

Nashik News : ३१-महापालिकेला पीएम ई - बस योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या इलेक्ट्रिकल बस चार्जिंगचा प्रकल्प अडचणीत आल्याने महापालिकेने तातडीने पोलिस आयुक्तांशी पत्रव्यवहार करून काम पूर्ण करण्यासाठी बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. (NMC Demand for provision for charging station bus depot work)

महापालिकेकडून सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात अडीचशे बस सुरू करण्यात आल्या आहेत. यात २०० सीएनजी, तर ५० डिझेल बस रस्त्यावर धावत आहे. केंद्र शासनाने पीएम ई-बस योजनेअंतर्गत १०० इ- बस महापालिकेला मंजूर केल्या. पहिल्या टप्प्यात ५० बस महापालिकेला मिळणार आहे.

बस चार्जिंग करण्यासाठी जेबीएम इको लाइफ मोबालिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसमवेत करार करण्याची तयारी करण्याचा प्रस्ताव महासभेवर आहे. बस मंजूर झाल्यानंतर त्याच्या बरोबरीनेच चार्जिंग डेपोदेखील उभारणे आवश्यक आहे. (latest marathi news)

charging station
Nashik Officers Fake Proof : मरकडने दिलेले पुरावेही बनावट! राज्यसेवा आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

मात्र ज्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे, त्या जागेत ट्रक टर्मिनस ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने सुविधा देण्याची मागणी करत चार्जिंग डेपोला विरोध केला. सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर बस डेपोचे काम सुरू होणे अपेक्षित होते.

मात्र, अद्यापपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी पत्रव्यवहार करून चार्जिंग स्टेशन व बस डेपोचे काम पूर्ण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागितला आहे.

charging station
Nashik Crop Loan : आदिवासी शेतकऱ्यांच्या पीककर्ज माफीचा प्रस्ताव द्या! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.