Nashik NMC : जन्म-मृत्यू दाखले वितरण 10 दिवसांपासून ठप्प! मुख्य सर्व्हर बंद

Nashik News : जन्म- मृत्यू नोंदणीचे मुख्य सर्व्हर बंद असल्याने महापालिका विभागीय कार्यालयांतील दोन्हीही दाखले वितरणाचे काम गेले दहा दिवसापासून ठप्प आहे.
Application for certificate due to server down.
Application for certificate due to server down.esakal
Updated on

Nashik News : जन्म- मृत्यू नोंदणीचे मुख्य सर्व्हर बंद असल्याने महापालिका विभागीय कार्यालयांतील दोन्हीही दाखले वितरणाचे काम गेले दहा दिवसापासून ठप्प आहे. पूर्व विभागीय कार्यालयाचा विचार केला असता सुमारे १ हजार दाखल्याचे अर्ज पडून आहे. नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (NMC Distribution of birth and death certificates stopped for 10 days Main server shutdown)

शिक्षणासह विविध कामांसाठी जन्माचे दाखले तर अन्य कामांसाठी मृत्यू दाखल्यांची आवश्यकता भासत असते. सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तसेच शाळेतही विविध कारणांसाठी दाखल्यांची आवश्यकता भासत असते. त्यानिमित्ताने नागरिकांकडून जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये अर्ज केले आहेत.

जन्म मृत्यूची नोंदणी असलेले केंद्रीय सर्व्हर दहा दिवसापासून बंद आहे. सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून नवीन सॉफ्टवेअरची प्रणाली अमलात आणली जात आहे. त्यामुळे सर्व्हर बंद करण्यात आले असल्याने दैनंदिन मोठ्या प्रमाणावर अर्ज पडून आहे. त्यांची एंट्री, स्कॅनिंग होत नाही. त्यामुळे दाखले तयार होत नाही.

नागरिकांना मात्र आवश्यकता असल्याने त्यांच्याकडून कार्यालयाच्या फेऱ्या मारणे सुरू आहे. दाखले मिळत नसल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्याच्या घटना घडत आहे. गेल्या दहा दिवसात पूर्व विभागीय कार्यालयात जन्म आणि मृत्यू दोन्ही दाखल्यांसाठी मागणी केलेले सुमारे १ हजार दाखल्याचे अर्ज पडून आहे. (latest marathi news)

Application for certificate due to server down.
Nashik News : धार्मिक क्षेत्रात राहुल गांधींच्‍या वक्‍तव्‍याचे पडसाद! प्रतिक्रियांतून संताप व्‍यक्‍त; दिले आध्यात्मिक दाखले

नागरिकांचे शैक्षणिक कामासह इतर विविध कामे ठप्प पडली आहे. तर दुसरीकडे महापालिकेची इंटरनेट नेटवर्क समस्यांसह कर्मचाऱ्यांचे यूजर आयडी नसणे. यामुळे कामात अडचणी येऊन दाखले तयार करण्याचे काम प्रतीक्षेत आहे. त्वरित दाखले वितरणाचे कामे सुरू करण्यात यावे.

महापालिकेने यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून सर्व्हर त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. नेटवर्क समस्या सोडवावी. कर्मचाऱ्यांना त्वरित यूजर आयडी उपलब्ध करून द्यावेत. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वितरण ठप्प असण्याची कारणे

-जन्म-मृत्यू नोंदणीचे केंद्रीय मुख्य सर्व्हर बंद

-कामे करण्यासाठी संगणकास नेटवर्क मिळत नाही

-सॉफ्टवेअर नावीन्य करण्याच्या काम सुरू

-कर्मचाऱ्यांना यूजर आयडी नाही

-अधिकाऱ्यांचे यूजर आयडी वापरण्यास परवानगी नाही

-नोंदणी अर्ज आणि कागदपत्र स्कॅनर सुविधा नाही

-डाटा एंट्री होत नाही

Application for certificate due to server down.
Nashik News : व्ही. एन. नाईक संस्था निवडणुकीत उमेदवारांना ‘भगरे पॅटर्न’ची धास्‍ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.