Nashik NMC News : घर व पाणीपट्टी शंभर टक्के वसुलीचा आकडा गाठण्यासाठी आता शहरात आउटसोर्सिंगच्या माध्यमातून देयके वाटप करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी २२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तीन विभागांसाठी एक या प्रमाणे दोन मक्तेदार संस्थांच्या माध्यमातून देयकांचे वाटप केले जाणार आहे. घर व पाणीपट्टीची देयके ग्राहकांना वेळेत पोचत नाहीत. (Nashik NMC distribution of payments through outsourcing in city to achieve house and water bill collection figure)
त्याचा परिणाम थेट मनपाच्या महसूल उद्दिष्ट गाठण्यावर होतो. सद्य:स्थितीत महापालिकेकडे मनुष्यबळ नाही. घर व पाणीपट्टी देयके वाटप करण्यासाठी २१५ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु यासाठी अवघे ८० कर्मचारी काम करतात. शासनानेही रिक्तपदांची भरती करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या देयके वाटपाच्या धर्तीवर शहरात घर व पाणीपट्टी देयके वाटप करण्याच्या निर्णय घेण्यात आला.
पिंपरी-चिंचवड विभागाच्या धर्तीवर प्रशासनाने घर, पाणीपट्टी देयक वाटप बाह्य अभिकरणामार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा घरपट्टीचे अडीचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.(latest marathi news)
त्यातील १२० कोटी रुपये गेल्या चार महिन्यात वसुल झाले. १४० कोटी व थकबाकी आहे. सद्यःस्थितीत पाच लाख ३७ हजार ८५१ मिळकती आहे.
कर विभागाकडे डेटा
देयके वाटप करताना संबंधित मक्तेदार संस्थेकडून प्रत्येक मिळकतीचा पूर्ण पत्ता, मिळकतधारकाचा भ्रमणध्वनी क्रमांक, ई- मेल, विद्युत देयकाचे ग्राहक क्रमांकाची नोंद संगणकावर घेणे, प्रतिवर्षी एप्रिलमध्ये घरपट्टीच्या देयकांचे वाटप करणे, वार्षिक मागणीची छपाई करणे.
नळजोडणीधारकांचे सर्वेक्षण, पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी, ई-मेल, मालमत्ता कराचा इंडेक्स क्रमांक, विद्युत देयकाचे ग्राहक क्रमांक, अनधिकृत नळजोडणी शोधमोहिम, नोटिसा बजावणे आदी माहिती संकलित केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.