Nashik NMC : प्लॅस्टिक वापर प्रकरणी 20 हजाराचा दंड वसूल

Nashik News : महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सिंगल युज प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत असून पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जवळपास साठ ठिकाणी तपासणी केली.
NMC Nashik
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सिंगल युज प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत असून पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जवळपास साठ ठिकाणी तपासणी केली. यात चार ठिकाणी सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई केली असून. (Fine of 20 thousand will be collected in case of plastic usage)

त्यांच्याकडून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर व अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी मदन हरीश्‍चंद्र.

विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे विभागीय यांनी ५ पंचवटी विभागातील पथकामार्फत व्यापक मोहीम हाती घेतली. विभागातील ६० आस्थापनाची सिंगल युज प्लॅस्टिक वापराबाबत तपासणी करण्यात आली. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik Police Transfer : बदल्यांनी ‘कहीं खुशी... कहीं गम’! बदल्या करून आयुक्त आठवडाभर सुट्टीवर

या तपासणी दरम्यान ४ आस्थापना सिंगल युज प्लॅस्टिक वापर करताना आढळून आल्याने पहिला गुन्हा पाच हजार रुपयाप्रमाणे २० रुपये दंड करून १२ किलो सिंगल युज प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. स्वच्छता निरीक्षक जितेंद्र परमार, सुशील परमार, प्रशांत तेजाळे.

राकेश साबळे, सागर रेवर व वाहनचालक संजय जाधव यांच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली. ही मोहीम अशीच न सुरू राहणार असून व्यावसायिक तसेच नागरिकांनी पर्यावरणास बाधा निर्माण होणार नाही याकरिता प्लॅस्टिक न पिशवी वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

NMC Nashik
Nashik Police : नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 75 दुचाक्या सामील; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.