NMC Fire Audit : महापालिकेच्या माध्यमातून कारागृहाजे फायर सेफ्टी ऑडिट

Fire Audit : नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात फायर ऑडिट न झाल्याने व भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून फायर सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे.
Fire Audit
Fire auditesakal
Updated on

NMC Fire Audit : २७०० बंदिवान व जवळपास ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कायम वावर असलेल्या नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात फायर ऑडिट न झाल्याने व भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून फायर सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. संवेदनशील कारागृहांच्या यादीत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचा समावेश होतो. सद्यस्थितीत २७०० बंदीवान आहे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी साडेतीनशे अधिकारी व कर्मचारी जेलच्या आवारात कायम तैनात असतात. (NMC Fire safety audit of prisons through Municipal Corporation )

मुंबई, पुणे व नवी मुंबई येथील कारागृह भरल्याने नाशिक कारागृहावर त्याचा ताण पडतो. त्यामुळे या कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. या कैद्यांची सुरक्षा जपण्याची जबाबदारी येथील प्रशासनावर आहे. त्यामुळे भविष्यात कुठली दुर्घटना घडू नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.

देशात अनेक ठिकाणी हॉस्पिटल व खाजगी क्लासेसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य शासनानेदेखील सर्व शासकीय कार्यालय व आस्थापनांचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांनी महापालिकेकडे फायर ऑडिट करण्याची मागणी पत्राच्या माध्यमातून नोंदविली आहे. (latest marathi news)

Fire Audit
Fire Audit : फायर ऑडिट नसल्यास वीज, पाणीपुरवठा खंडित; रुग्णालयांना रेड ॲलर्ट

यंत्रणा नाही

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ नाही. त्यामुळे फायर ऑडिटचीदेखील व्यवस्था नाही. त्यामुळे मध्यवर्ती कारागृह विभागाने फायर ऑडिटचे पत्र पाठवले असले तरी अग्निशमन विभागाकडून मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला फायर ऑडिट करणाऱ्या संस्थांची यादी पाठविली जाणार आहे. अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली.

''महापालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने कारागृह प्रशासनाला फायर व ईलेक्ट्रिकल ऑडीट करणाऱ्या संस्थांची यादी पाठविली जाणार आहे.''- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी.

Fire Audit
NMC Hoarding Audit : शहरात 6 होर्डिंग जीवघेणे; दुरुस्तीसाठी 8 दिवसांची मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.