Nashik NMC News : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती मोफत

Nashik NMC : गणेशोत्सवाला सहा महिने शिल्लक असले तरी महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात आली आहे.
Shadu Mati Ganapati idol
Shadu Mati Ganapati idolesakal
Updated on

Nashik NMC News : गणेशोत्सवाला सहा महिने शिल्लक असले तरी महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात आली आहे. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरीस’पासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्ती तसेच प्लॅस्टिक व थर्माकोलच्या साहित्याला पूर्णपणे बंदी करून शाडू मातीच्या मूर्तींचा शंभर टक्के वापर करण्याच्या दृष्टीने महापालिका मूर्तिकारांना जागा देणार आहे. (Nashik NMC Free Shadu Mati for Eco Friendly Ganeshotsav)

त्याचप्रमाणे शाडू माती मोफत उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे १५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सण, उत्सवात प्रदूषण होवू नये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

त्यानुसार नाशिक महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, त्यास आयुक्तांनी १५ मार्चला मान्यता दिली. मार्गदर्शक सूचनानुसार महापालिका क्षेत्रात मूर्ती या नैसर्गिक व पर्यावरणपूरक जैवविघटक पदार्थांपासून तयार केलेल्या असाव्यात.

प्लॅस्टिक, थर्माकोल व पीओपीच्या मूर्ती नसतील. ओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींना बंदी राहील. सर्व मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच, रहिवासी संकुलातील टाकीमध्ये करणे अथवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक आहे. मूर्ती साठवणूकदारांनीदेखील विभागीय कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

पर्यावरणपूरक साहित्य, शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्धतेनुसार महापालिकेची जागा प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नि:शुल्क उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयांकडे १५ एप्रिलपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. (latest marathi news)

Shadu Mati Ganapati idol
Nashik Vegetables Rate Hike : पालेभाज्या, फळभाज्यांना आला ‘भाव’! उन्हामुळे आवक घटत चालल्याचा परिणाम

प्राप्त अर्जाची प्राधान्यक्रमानुसार छाननी करून ३० एप्रिलपर्यंत महापालिकेच्या उपलब्धतेनुसार जागा व शाडू माती मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेकडून फक्त जागा दिली जाणार आहे. आवश्यक असलेले शेड, विद्युत व्यवस्था, पाणी व्यवस्था मूर्तीकाराची राहणार आहे.

हमीपत्र बंधनकारक

शाडू मूर्तिकारांना या वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणारी जागा नवरात्रोत्सव समाप्तीपर्यंत मर्यादित कालावधीसाठी राहणार आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडविणारे मूर्तिकार, साठवणूकदारांनी शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविणार व साठवणार असल्याबाबतचे हमीपत्र महापालिकेला देणे बंधनकारक आहे.

अशा मूर्तिकारांनी त्यांच्या मंडपाबाहेर ‘येथे पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत’, अशा आशयाचा फलक लावणे बंधनकारक आहे.

मार्गदर्शक तत्त्वे

- रंगासाठी हळद, चंदन, गेरू यांचा वापर करावा.

- पूजेसाठी फुले, वस्त्र असे पूजा साहित्य पर्यावरणपुरक असावे.

- काच, धातूपासून बनविलेल्या ताट-वाट्याचा वापर करावा.

- प्लेटसाठी केळी व इतर पानाच्या पत्रावळीचा वापर करावा.

- प्लॅस्टिक प्लेट, प्लॅस्टिक साहित्याचा वापर करू नये.

Shadu Mati Ganapati idol
Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.