नाशिक, ता. ८ : भूसंपादन प्रकरणी प्रशासनाकडून नियमात प्रक्रिया पार पडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी राजकीय पक्षांकडून मात्र, यावर समाधान झालेले नाही. ५३. ५० कोटी रुपयांच्या भूसंपादन प्रकरणात भाजपच्या तीनही आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन पक्षाची बदनामी होत असल्याची तक्रार केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देखील तक्रार करण्यात आल्यानंतर तातडीने मंत्रालयात बैठकीचे आश्वासन देण्यात आले आहे. (NMC Land Acquisition BJP MLA complain to Fadnavis)