Nashik News : शहर व परिसरात वळवाचा पाऊस पडत असल्याने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी जूनमध्ये पडणारा पाऊस लांबण्याचीदेखील दाट शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. १५ जूनपर्यंत पाऊस न पडल्यास टंचाईची परिस्थिती गंभीर होणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून पर्जन्ययागाची तयारी सुरू झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. (Nashik NMC)
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सूचनेवरून मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाणी वाचले. परंतु दुसरीकडे पाणी कमतरतेमुळे महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्यात आली.
नाशिक साठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले. शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होतो. सद्यःस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. परंतु रोजचा पाणी वापर लक्षात घेता अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल आहे. सध्या ६०३ मीटरपर्यंत पाणी पातळी आहे. ५९९ पर्यंत जलपातळी आल्यास नाशिककरांसमोर जलसंकट उभे राहणार आहे.
हवामान खात्याने यंदा १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. परंतु सध्या वळवाचा पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम जून महिन्यात पडणारा नियमित पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. (latest marathi news)
त्यामुळे हवेत गारवा निर्माण होत असला तरी भविष्यातील संकटे वळवाच्या पावसामुळे आहे. पाऊस लांबणीवर पडल्यास जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. धरणात जेमतेम पाणीसाठा आहे.
१५ जूनपर्यंत पाऊस लांबला तरी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. गंगापूर धरणातील चर खोदाई आचारसंहितेत अडकली आहे. अद्यापपर्यंत चर खोदण्यास परवानगी मिळालेली नाही. या सर्व बाबी धान्यात घेऊन पाणीकपातदेखील लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत १५ जूनपर्यंत पाऊस पडणे आवश्यक आहे. शहराची गरज लक्षात घेऊन पाऊस न पडल्यास पर्जन्ययागदेखील करण्याची तयारी दर्शविण्यात आल्याची चर्चा आहे.
शहरासाठी पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफुटात)
- गंगापूर धरण- ३८०७
- दारणा व मुकणे धरण- १५०७
- एकूण आरक्षण- ५३१४
पाण्याचा वापर (दशलक्ष घनफूट)
- १५ ते ३१ ऑक्टोंबर- ३३४.६५
- एक ते ३० नोव्हेंबर- ५९३.६७
- एक ते ३१ डिसेंबर- ५९५
- एक ते ३१ जानेवारी- ६११.२७
- एक ते २९ फेब्रुवारी - ५७८.९८
- एक ते ३१ मार्च - ६०२.११
- एक एप्रिल ते ३० एप्रिल- ५९५.१४
- एक मे ते बार मे- २३३.२५
एकूण वापर- ४१४४.०७
धरणातील पाण्याचा शिल्लक साठा (दलघफु)
धरण शिल्लक साठा टक्के
गंगापूर २६२५ ८२.०७
दारणा १७७० २४.७६
मुकणे १५८७ २१.९२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.