NMC Tax Recovery : घरपट्टीत महापालिकेची विक्रमी वसुली; 203 कोटींचा भरणा, पाणीपट्टीने गाठली सरासरी

NMC : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी घरपट्टी वसुली झाली आहे.
NMC Tax Recovery
NMC Tax Recoveryesakal
Updated on

NMC Tax Recovery : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी घरपट्टी वसुली झाली आहे. सहा विभागांतून तब्बल २०६ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला तर पाणीपट्टीतून जवळपास ५४ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीतून जवळपास २६० कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे. घरपट्टी वसुलीसाठी चालू आर्थिक वर्षासाठी २१० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले होते. (nashik NMC Record collection of Municipal Corporation in property tax marathi news)

१५व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी महापालिकेला शासनाकडून महसूल वृद्धीची अट घातली गेल्याने घरपट्टीचे उद्दिष्ट २५० कोटींपर्यंत वाढविले. मात्र या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने महापालिकेच्या कर वसुली विभागाने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात नियमित करदात्यांसाठी सवलत योजना राबविल्यानंतर आता बड्या थकबाकीदारांविरोधात जप्ती वॉरंट बजावण्याची कारवाई सुरू केली.

त्यामुळे पहिल्या साडेचार महिन्यांतच महापालिकेच्या घरपट्टी वसुलीचा आकडा ११३ कोटी ९० लाखांवर पोचला होता. परंतु त्यानंतर लोकसभा निवडणुका, मराठा आरक्षणाचा सर्वे तसेच निवडणूक कामासाठी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त झाल्याने त्याचा परिणाम शंभर टक्के वसुलीवर होण्याची शक्यता निर्माण झाली, अशा परिस्थितीतही सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्रे सुरु ठेवली गेली. परिणामी विक्रमी वसुली झाली आहे.

घरपट्टीतून २०६ कोटी तर पाणी पट्टीतूनही सरासरी वसुली झाली. पाणीपट्टीचे ७५ कोटी रुपयांचे आर्थिक वर्षासाठी नियोजन होते. त्यातील ५४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. थकबाकीदारांवर आता कारवाई सुरु केली जाणार आहे. आर्थिक वर्षाच्या अकरा महिन्यात वसुलीचे नियोजन माजी कर उपायुक्त श्रीकांत पवार यांनी केले तर उर्वरित कालावधीत प्रभारी कार्यभार असलेले उपायुक्त विवेक भदाणे यांनी केले.  (latest marathi news)

NMC Tax Recovery
NMC News : महापालिकेकडून थकबाकीदारांचे 10 गाळे जप्त

घरपट्टीची विभागनिहाय वसुली (कोटीत)

विभाग प्राप्त महसुल

सातपूर २२.९८

पश्‍चिम ३४.०४

पूर्व ३४.१६

पंचवटी ३९.५१

सिडको ४३.४४

नाशिकरोड ३१.९०

एकूण २०६.०३

NMC Tax Recovery
Nashik NMC News : सहा दिवसात 8 कोटी वसुलीचे मनपामोर आव्हान!

पाणीपट्टीची विभागनिहाय वसुली (कोटीत)

विभाग प्राप्त महसूल

सातपूर ५.९३

पश्‍चिम ८.१८

पूर्व ११.२८

पंचवटी ११.७२

सिडको ६.९८

नाशिकरोड ९.९६

एकूण ५४.०५

NMC Tax Recovery
NMC News : होर्डिंग घोटाळ्याचा अहवाल नव्हे, अभिप्राय; संघटना न्यायालयात जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.