Nashik NMC News : एकीकडे निवडणुका, दुसरीकडे खोदकाम; वैतागलेल्या नाशिककरांना दिलासा देण्यासाठी 15 मे ‘डेडलाईन’

Nashik News : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी बीएसएनएल तसेच पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले जात असल्याने त्यातून विद्रूपीकरणाबरोबरच अपघात होत आहे.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

Nashik News : घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरविण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी बीएसएनएल तसेच पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले जात असल्याने त्यातून विद्रूपीकरणाबरोबरच अपघात होत आहे. त्यामुळे एकीकडे निवडणुकांचा ज्वर वाढतं असताना दुसरीकडे रस्ते खोदले गेल्याने त्यातून नाशिककरांच्या मनस्तापात भर पडली आहे. (Roads are being dug up to lay pipelines causing accidents)

वाढत्या तक्रारींची दखल घेत रस्ते कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने १५ मेपर्यंत डेडलाईन आखून दिली आहे. त्यानंतरही काम सुरू राहिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिका हद्दीत घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून खोदकाम सुरू आहे.

खोदकामाच्या बदल्यात एमएनजीएलने महापालिकेकडे खड्डे खोदायची रॉयल्टीदेखील भरली आहे. मात्र रॉयल्टी भरल्यानंतर महापालिकेने रस्ते नावावर केल्याच्या आविर्भावात खोदकाम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले खोदकाम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे बांधकाम विभागाला वारंवार रस्त्यांची दुरुस्ती करावी लागते.

नागरिकांनादेखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असून वाहतूक ठप्प होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार खड्डा करताना २०० ते ३०० मीटर खड्डा खोदून त्यात पाइपलाइन टाकून तो खड्डा बुजविणे, त्यानंतर पुढचे काम हाती घेणे असे अभिप्रेत आहे. मात्र खर्च वाचविण्यासाठी एक ते दीड किलोमीटर खड्डा खोदला जातो.

यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खड्डा खोदतानादेखील नियम आहे. मात्र जेसीबीचा पंजा खोलवर घुसवून खड्डे खोदले जात असल्याने त्यामुळे पाण्याच्या लाईन फुटून पाणीपुरवठा विस्कळित होतो व ड्रेनेजलाइन फुटल्याने परिसरात दुर्गंधी साचून पुढची प्रक्रिया विस्कळित होते. (Latest Marathi News)

Nashik NMC
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, भगरेविरोधातील तक्रारी निकाली; छाननीअंती नाशिक मतदारसंघातून 36 जणांचे अर्ज वैध

८१ कोटी दुरुस्ती खर्च

रस्ते खोदण्याच्या बदल्यात महापालिकेकडे ८१ कोटी रुपये दुरुस्ती खर्च देण्यात आला आहे. इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी ऑप्टिकल फायबर टाकले जात आहे. त्यासाठीदेखील रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. सिग्नल यंत्रणा व सीसीटीव्ही कॅमेरे कमांड कंट्रोल सेंटरला जोडण्यासाठी रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम, प्रचार सभा, रॅली यामुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे रस्ते खोदकामामुळे मनस्तापात भर पडली आहे. बांधकाम विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे त्रास अधिक वाढण्याची शक्यता असल्याने रस्ते खोदकाम १५ मेपर्यंत पूर्ण करून त्यानंतर ३० मेपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना बांधकाम विभागाने दिल्या आहेत.

खड्डा खोदताना महत्त्वाच्या सूचना

- खड्डा खोदण्यापूर्वी परवानगी आवश्‍यक.

- पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम अभियंत्यांची उपस्थिती.

- रस्त्यावरील माती हटविण्यासाठी छोटा जेसीबी, रोडरोलर जागेवर.

- शंभर मीटरपर्यंतच खड्डा खोदण्यास परवानगी.

"पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांच्या कडेला असलेले खड्डे बुजविणे गरजेचे आहे. १५ मेपर्यंत रस्त्याचे खोदकाम करू ३० मेपर्यंत दुरुस्ती कराव्यात. अन्यथा कारवाई केली जाईल." - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा.

Nashik NMC
Nashik Water Shortage : टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अघोषित पाणीकपात; शहरात प्रतिनागरिक सव्वाशे लिटर पाणीपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.