नाशिक : महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती, जमाती तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याण योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (Scholarship) देण्याचा निर्णय झाला आहे. सन २०२४ व २५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik NMC Scholarship for Underprivileged Students marathi news)
महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग तसेच महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. मागासवर्गीय कल्याणकारी योजना महिला व बालकल्याण दिव्यांग कल्याण तसेच क्रीडा धोरणासाठी अंदाजपत्रकात त्यासाठी एकूण अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.
त्यानुसार महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय कल्याणकारी योजना अंतर्गत या वर्षापासून मागासवर्गीय युवक व युवतींसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांतील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार आहे.
महापालिका हद्दीतील मागासवर्गीयांसाठी ही योजना आहे. मागासवर्गीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली. (Latest Marathi News)
घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या महिला व त्यांच्या मुलांसाठी विविध योजना आहेत. चालू आर्थिक वर्षात २९५ महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. शहरातील महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी आता प्रथम अर्थसहाय्य योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी उद्यान उभारणार
शहरात राहणाऱ्या दिव्यांगांसाठी बारा कल्याणकारी योजना आहेत. २५६० दिव्यांगांना त्यांचा लाभ दिला आहे. बेरोजगार दिव्यांग अर्थसाह्य योजना व गतीमंद तसेच बहुविकलांग दिव्यांग अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत दरमहा अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होते.
आगामी २०२४ व २५ या आर्थिक वर्षात दिव्यांगांसाठी त्याच धर्तीवर स्वतंत्र विशेष उद्यान उभारले जाणार आहे. यात दिव्यांगांना सहज हाताळता येईल, असे साहित्य उभारले जाणार आहे. गंगापूर रोडवरील कानिटकर उद्यानामध्ये अशा प्रकारच्या सोयी उभारण्याचे नियोजन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.