NMC News : शहरालगतची गावे महापालिका हद्दीत..! लोकप्रतिनिधींचा दबाव, मात्र प्रशासनाचा नकार

NMC : महापालिकेची स्थापना होत असताना जवळपास २८ गावांनी नाशिकमध्ये येण्यास नकार दिला.
nmc
nmc esakal
Updated on

NMC News : महापालिकेची स्थापना होत असताना जवळपास २८ गावांनी नाशिकमध्ये येण्यास नकार दिला. परंतु आता शहराला लागून असलेल्या या गावांमध्ये नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत असल्याने तो खर्च ग्रामपंचायतींना पेलवत नाही. त्यामुळे आता महापालिका हद्दीत समाविष्ट होण्यासाठी लोकप्रतिनिधींकरवी शासनाकडे प्रस्ताव पाठविले जात आहे. (nashik NMC Suburban villages within municipal limits marathi news)

निवडणुकांच्या तोंडावर शासनाकडून एकतर्फी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु महापालिका हद्दीमध्ये बिनशेती अर्थात येलो क्षेत्र अधिक असल्याने मुळात त्याच क्षेत्रावर विकास झाला नसल्याने नवीन गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करणे परवडणारे नसल्याची मानसिकता महापालिकेची आहे. महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली.

दहा वर्षे प्रशासक राहिल्यानंतर १९९२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींच्या मार्फत कामकाज होवू लागले. तत्पूर्वी घोषणा झाल्यानंतर महापालिकेची हद्द निश्‍चित करण्यात आली. जवळपास २५९ चौरस किलोमीटर महापालिकेचे प्रत्यक्षात क्षेत्र असले तरी अतिरिक्त ६७ चौरस किलोमीटर क्षेत्र होते. परंतु २९ गावांनी महापालिकेत येण्यास नकार दिल्याने २५९ चौरस किलोमीटर क्षेत्राची निश्‍चिती करण्यात आली.

त्या वेळी करांचा बोजा पडेल या भीतीने अनेक गावांनी महापालिकेत समाविष्ट होण्यास नकार दिला. परंतु शहरात जमिनींचे भाव गगनाला भिडले आहे. महागडे घर परवडत नाही. त्याशिवाय चांगल्या भागात राहण्याकडे अधिक कल आहे. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने व वाढत्या किमती लक्षात घेऊन भविष्याची तजवीज म्हणून महापालिका हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये नागरिकरण वाढतं आहे. (latest marathi news)

nmc
NMC News : वाहतूक समस्या निवारणासाठी महापालिकेत ट्रॅफिक सेलची निर्मिती

पायाभूत सुविधांवर ताण

नागरीकरण वाढतं असल्याने पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, आरोग्य सुविधांवरचा ताण वाढत आहे. वैद्यकीय सुविधा नसल्याने नाशिक रोड भागातील बहुतांश गावे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेतात.

ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन नसल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आमदार निधीवर अवलंबून राहावे लागते. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्याने महापालिकेत ग्रामपंचायती समाविष्ट करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.

महानगर प्राधिकरणाकडे अपुरा निधी

नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर महापालिका हद्दीपासून ६० किलोमीटर अंतरावरील जवळपास ६२ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु चांदशी, तिरडशेत, जलालपूर, पळसे, ढकांबे, वरवंडी, सय्यद पिंपरी, एकलहरे, सामनगाव वगळता अन्य गावांचा महसुल कमी आहे.

nmc
NMC News : महापालिकेच्या ‘ट्रॅफिक सेल’ला अनुभवाचे वावडे! नवखा उमेदवारही कार्यकारी अभियंता पदास पात्र

प्राधिकरणाकडे सद्यःस्थितीत ६७ कोटींचा निधी असून विकासकामांसाठी अपुरा निधी आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये नागरीकरण वाढत आहे. परंतु पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी निधी कमी पडतं आहे. अशी गावे महापालिकेत येण्यास उत्सुक आहे. लोकप्रतिनिधींकडून महापालिका तसेच शासनाला पत्र देण्यात आले आहे.

महापालिका हद्दीला लागून असलेली गावे

- चांदशी, जलालपूर, तिरडशेत, जऊळके, माडसांगवी, सुलतानपूर, सय्यद पिंपरी, एकलहरे, सामनगाव, बाभळेश्‍वर, पळसे, बेलतगव्हाण, विल्होळी, सारूळ, बेळगाव ढगा, गोवर्धन, वासाळी, दुगाव, मातोरी, रामशेज, ढकांबे, वरवंडी, शिवनई, जानोरी, पिंपळगाव खांब, शिंगवे-बहुला, नांदूर बहुला, गौळाणे.

''महापालिका हद्दीत बिनशेती क्षेत्र अधिक आहे. त्या क्षेत्राचा विकास अद्याप पूर्णपणे झालेला नाही. त्यामुळे नवीन क्षेत्राचा समावेश करणे महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.''- हर्षल बाविस्कर, उपसंचालक, महापालिका.

nmc
NMC News : कायमस्वरूपी 24 केंद्रप्रमुखांच्या पदनिर्मितीला मंजुरी; शालेय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.