NMC News : ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प महापालिकेने ताब्यात घेतला आहे. प्रकल्पात ना दुरुस्त झालेला गॅस व हवेचा बलून नव्याने बदलून प्रकल्प चालविला जाणार आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी महापालिकेकडून ‘जीआयझेड’ अंतर्गत २०१८ मध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू केला. (nashik NMC Waste to Energy project marathi news)
बंगलोर येथील विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम देण्यात आले. शहरात हॉटेल व अन्य मार्गाने तयार होणारा ओला कचरा संकलित करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे व प्रकल्प चालविणे त्या बदल्यात महापालिकेला ३३०० युनिट वीजपुरवठा करण्याची जबाबदारी कंपनीकडे होते.
महापालिकेकडून संबंधित कंपनीला मासिक पाच लाख रुपये खर्च दिला जाणार होता. परंतु, प्रकल्प सुरू झाल्यापासून महापालिकेला अद्यापपर्यंत वीजपुरवठा करण्यात आला नाही. ओल्या कचऱ्याचेदेखील संकलन झाले नाही. वीज उपलब्ध करून न दिल्याने महापालिकेने संबंधित कंपनीला नोटीस बजावली. परंतु कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. (latest marathi news)
यातून कायदेशीर मार्ग काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या लवादाकडे दाद मागण्यात आली. लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार १९ जुलै २०२१ ला महापालिकेने करार रद्द केला. प्रकल्पामध्ये गॅस व हवेचा बलून आहे.
अनेक दिवस बंद असल्याने बलूनला छिद्र पडले आहे. परिणामी गॅस निर्मिती करण्यात अडथळे निर्माण होतात. वीजनिर्मितीदेखील घटली आहे. त्यामुळे गॅस व हवेचा बलून नव्याने टाकण्यासाठी जवळपास ५० लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली.
''ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प महापालिकेने ताब्यात घेतला आहे. गॅस व हवेचा बलून नादुरुस्त झाल्याने वीज निर्मिती रखडली. त्यामुळे नव्याने बलून बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.''-बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.