Nashik NMC News : विधानसभा निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्यानंतर त्या कालावधीमध्ये महापालिकेकडे जवळपास पन्नासहून अधिक प्रकल्प हस्तांतरित करण्याच्या राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने ब्रेक लावला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षे देखभाल- दुरुस्ती करावी.
त्यानंतर प्रकल्प सुस्थितीत असेल तरच महापालिका तो प्रकल्प चालविण्यास घेणार असल्याची स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात दोन शासकीय संस्थांमध्ये प्रकल्प हस्तांतरणावरून वाद होणार आहे. तर दुसरीकडे शासनाच्या बांधकाम विभागामार्फत प्रकल्प पूर्ण करणाऱ्या आमदारांविरोधातदेखील दंड थोपटण्यात आले आहे. (NMC will take responsibility of works in good condition)