Nashik News : न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अनुसरून पेसा क्षेत्रातील पात्रताधारकांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची बुधवारी (ता. ७) आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याबरोबर झालेली बैठक निष्फळ ठरली.
त्यानंतर, उपोषणकर्त्यांनी गुरुवारी (ता. ८) सकाळी बैठक घेत, बेमुदत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शासनाने नियुक्तिपत्रे दिल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नसल्याची भूमिका संघटनेचे सचिव शांताराम पवार यांनी सांगितले. (Nashik Determination to continue indefinite hunger strike of PESA Eligibles)
दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोसकर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता चारोसकर यांनी गुरुवारी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. श्रीमती चारोसकर यांनी उपोषणकर्त्या तरुणींना आवश्यक ती मदत दिली. संवर्ग भरती याबरोबरच पेसाभरती ही राज्य सरकारतर्फे कायमस्वरूपी करण्यात यावी, कोणत्याही प्रकारे तात्पुरत्या किंवा कंत्राटी स्वरूपाची ही भरती करू नये या प्रमुख मागणीसाठी आदिवासी विभागातील पात्रताधारक तरुण आणि तरुणींचे बेमुदत उपोषण सुरू आहे.
या उपोषणाची दखल घेत, आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांनी मंत्रालयात बैठक घेतली. पेसा क्षेत्रातील भरतीला न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून परवानगी मिळावी, यासाठी शासनातर्फे महाधिवक्ता यांच्यामार्फत म्हणणे मांडले जाईल. त्यावर न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती डॉ. गावित यांनी केली. मात्र, उपोषणकर्त्यांनी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे या वेळी सांगितले. त्यानुसार गुरुवारी मुंबईत बैठकीसाठी गेलेल्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी बैठक घेतली. यात, मंत्रालयात झालेल्या बैठकीतील तपशील सांगण्यात आला. मात्र, आंदोलनाबाबत कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने बेमुदत उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय या वेळी झाला. (latest marathi news)
"मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही. आंदोलनकर्त्यांची नियुक्तिपत्रे मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका आहे. त्यामुळे बेमुदत उपोषण कायम राहील. यावर पुन्हा तीन दिवसांनी बैठक होणार असून, पुढील दिशा ठरविली जाईल.'
- शांताराम पवार, आदिवासी १७ संवर्ग पेसा पदभरती कृती समिती
आंदोलकांच्या मनधरणीचा प्रयत्न
ईदगाह मैदानावर पेसा पात्रताधारक उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे. आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त (मुख्यालय) तुषार माळी व उपायुक्त संतोष ठुबे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागण्यांवर ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.