लासलगाव : केंद्र व राज्य सरकारच्या कांदा निर्यात धोरणाच्या भूमिकेमुळे शेती उद्योग व परकीय चलन यावर गदा येऊ बघत आहे. त्यामुळे सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी ठोस पावले उचलल्यास थोड्या-फार प्रमाणात हा प्रश्न सुटू शकेल. यासाठी कांदा निर्यात सद्यःस्थिती, निर्यातीतील अडचणी व शासन स्तरावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा ऊहापोह होणे आवश्यक असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. (restrictions on foreign exchange due to role of onion export policy)