Nashik News : नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजी चौकात मद्यपी चालकाने वेगात कार चालवून रस्त्यालगतची संरक्षण भिंत तोडून रो-हाऊसमध्ये घुसल्याची घटना घडली होती. यात पोर्चमध्ये झोपलेल्या ६ वर्षीय चिमुरड्यासह दांपत्य आणि कारचालकही जखमी झाला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मद्यपी कारचालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे दिले असून अद्यापपर्यंत ते मिळालेले नाहीत. (Non receipt of report from forensic laboratory)
दरम्यान, संशयित कारचालकाने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. जगदीश खरमाडे असे मद्यपी कारचालकाचे नाव असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ३ जूनच्या मध्यरात्री झालेल्या या अपघातामध्ये सुरेश कृष्णा भदाणे (६०), कलाबाई सुरेश भदाणे (५८), पृथ्वी सूरज सूर्यवंशी (६, सर्व रा. शिवाजीनगर) यांच्यासह संशयित कारचालक खरमाडे देखील जखमी झाला होता. संशयित कारचालकाविरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या अपघातामध्ये संशयित कारचालकासह चौघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, संशयित खरमाडे याचे रक्ताचे नमुने घेऊन ते तत्काळ तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. (latest marathi news)
परंतु दोन आठवडे होऊनही संबंधित न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झालेला नाही. दरम्यान, संशयित खरमाडे याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.
"अपघातप्रकरणी संशयित कारचालकाविरोधात गुन्हा दाखल असून, त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसात मिळण्याची शक्यता आहे." - तृप्ती सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.