SAKAL Exclusive : भावातील हमी, तीन वर्षात इथेनॉलसाठी वाढलेली मागणी, कमी खर्चात अधिक उत्पादन, यासह अनेक कारणांमुळे जिल्ह्यात मका (पिवळे सोने) शेतकऱ्यांचे लाडके आणि हक्काचे पीक बनले आहे. यावर्षी राज्यात सर्वाधिक मका लागवड नाशिकमध्ये झाली आहे.विशेष म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र उत्तर महाराष्ट्रातील आहे. तृणधान्य पीक म्हणून मकाची ओळख आहे. ()