Nashik: वर्ष उलटूनही मिळेना पीकविम्याची रक्कम! जिल्ह्यातील शेतकरी वैतागले; येवल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Latest Nashik News : जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा कंपन्यांच्या कारभाराला वैतागले असून राहिलेल्या पिकांचा पीक विमा तत्काळ शेतकऱ्यांना मिळावा अन्यथा शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
A farmer giving a statement of demand for crop insurance money to Taluka Agriculture Officer Shubham Baird.
A farmer giving a statement of demand for crop insurance money to Taluka Agriculture Officer Shubham Baird.esakal
Updated on

येवला : मागील वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिकांची पूर्ण वाताहात झाली होती, किंबहुना दुष्काळी जाहीर झालेला आहे. असे असतानाही पीक विमा कंपन्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिलेले नाहीत. जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा कंपन्यांच्या कारभाराला वैतागले असून राहिलेल्या पिकांचा पीक विमा तत्काळ शेतकऱ्यांना मिळावा अन्यथा शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. (farmers Not getting crop insurance amount even after year)

सहावी आणि शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता.२४) तालुका कृषी अधिकारी शुभम मेरळ यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार मागील वर्षी खरिपातील सर्वच पिकांची वाहतात झाली असून किंबहुना शेतातच पिके करपल्याचे सर्वच यंत्रणांनी, अधिकाऱ्यांनी पाहिले.

त्याचे पंचनामेही झाले होते. तालुक्यातील सर्वच मंडळात २५ दिवसापर्यंत पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला अन काही शेतकऱ्यांना उत्पादनात शंभर टक्के नुकसान झाले. सरासरी विचार केला तरी हंगामातील उत्पादन हे जवळपास ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त घटले.

पीकविम्याच्या तरतुदीनुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नात घट होणार असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार कृषिमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केल्यानंतर ही अनेक दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळालेली नाही. (latest marathi news)

A farmer giving a statement of demand for crop insurance money to Taluka Agriculture Officer Shubham Baird.
Marathwada: मराठवाड्यात शिंदे भाजपचं टेंशन वाढणार? शिवसेना उभा करणार अपक्ष उमेदवार!

अग्रिमच मदत गेली कुठे?

सुमारे २५ टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याची घोषणा झाली खरी पण सुरवातीला कंपन्यांनी मोजक्या शेतकऱ्यांना रक्कम वर्ग केली आणि नंतर हा विषयच मागे टाकल्याचे दिसते. तालुक्यात यावर्षी ७८ हजार ९६६ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे.यापैकी तब्बल ५२ हजारावर शेतकऱ्यांना अजून विम्याची प्रतिक्षाच असल्याने हा दुजाभाव कसा केला असा सवाल व्यक्त होत आहे.

पाटोदा, अंदरसूल, राजापूर, अंगणगाव, येवला या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे तर जळगाव नेऊर, सावरगाव, नगरसूल इतर भागातील शेतकरी मात्र मदतीपासून अद्यापही प्रतीक्षेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पूर्ण तालुका दुष्काळी जाहीर झाल्याने सर्व शेतकऱ्यांना ७० टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाईची मदत मिळणे अपेक्षित होते.

मात्र तसे झालेलेच नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेवर विमा काढला होता. पूर्ण वर्ष वाया गेल्याने अजूनही आर्थिक विवंचना असून बाजरी व मूग याच पिकांचाच विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे. उर्वरित इतर सर्व पिकांचा विमा अद्याप बाकी असल्याने तो तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना जिल्हा संपर्कप्रमुख मच्छिंद्र जाधव, तालुकाध्यक्ष दिगंबर दौंडे, विलास दरगुडे, शरद आव्हाटे, किरण दरगुडे, बाळासाहेब पवार, गणपत पवार, उत्तम सोनवणे, प्रकाश सोनवणे, राहुल मोरे, देवेंद्र जाधव, गणपत काळे, सीताराम गागरे, परसराम सोनवणे आदींच्या सह्या आहेत.

A farmer giving a statement of demand for crop insurance money to Taluka Agriculture Officer Shubham Baird.
Vidhan Sabha Election: उत्तर महाराष्ट्रात दीड कोटी मतदारांची नोंद! हजारो अर्ज प्रलंबित; विधानसभा निवडणुकीत मतदारांचा टक्का वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.