Backward Class Reservation : मागासवर्गीयांच्या जागेचे आरक्षण बदलासाठी सूचना! नवीन वाद उद्भवण्याची शक्यता

Latest Nashik News : सदर जागेवर अनेक वर्षांपासून अन्य समाज घटक राहत असल्याचे कारण देत येथील जागेवरील मूळ आरक्षणाचे प्रयोजन बदलून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदरची राखीव करण्याचा मानस व्यक्त करत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
Reservation
Reservationesakal
Updated on

नाशिक : महापालिकेत एकापाठोपाठ एक वादग्रस्त प्रकार समोर येत असताना त्यात आता शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मागासवर्गीयांच्या जागेवरील आरक्षण बदलून आर्थिक दुर्बल घटकांसाठी ती जागा खुली करण्यासाठी हरकती व सूचना मागविण्यात आल्याने यावरून आता नवीन वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Notice for reservation change of backward class seat)

शहरातील रविवार पेठ भागामध्ये अनेक वर्षांपासून सफाई कामगारांसाठी वसाहत बांधण्यात आली आहे. सदर इमारत जुनी झाल्याने ती इमारत पाडून नव्याने बांधावी, अशी मागणी सफाई कामगार संघटनांकडून होत असताना मंगळवारी (ता. २४) महापालिकेच्या नगररचना विभागाने या जागेवर अर्थात नगर रचना योजना क्रमांक एकनुसार सर्वे क्रमांक ४९१ पैकी आरक्षित अंतिम भूखंड क्रमांक २५१ मधील तीन एकर जागेवरील आरक्षण प्रयोजन बदलण्याचा उद्देश प्रसिद्ध केला आहे.

सदर जागा म्युनिसिपल मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी आरक्षित आहे. मात्र, सदर जागेवर अनेक वर्षांपासून अन्य समाज घटक राहत असल्याचे कारण देत येथील जागेवरील मूळ आरक्षणाचे प्रयोजन बदलून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदरची राखीव करण्याचा मानस व्यक्त करत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. (latest marathi news)

Reservation
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघजले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

पुन्हा वादग्रस्त निर्णय

ऑगस्टमध्ये ५५ कोटी रुपयांचे वादग्रस्त भूसंपादन, शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, ड्रेनेजच्या कामामध्ये २७ माजी नगरसेवकांनी घेतलेल्या उड्या, गोविंदनगर रस्त्याची संरचना बदलणे, गंगापूर रोडवरील शैक्षणिक प्रयोजनाचा भूखंड रहिवासी क्षेत्रात बदलणे, गंगापूर रोडवरील सोमेश्वरच्या अलीकडील रस्त्याचे संरचना बदलणे यासारख्या वादग्रस्त निर्णयावरून महापालिका प्रशासनाची बदनामी झाली.

असे असताना आता पुन्हा आवश्यकता नसताना मागासवर्गीयांसाठी असलेल्या जागेवरचे आरक्षण बदलून खुले करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे एकापाठोपाठ घेण्यात येत असलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

"मागासवर्गीय म्युनिसिपल कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी असलेली जागा सर्व स्तरावरील आर्थिक दुर्बल घटकांसाठी खुली करण्यासंदर्भात सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत."

- हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना विभाग.

Reservation
Nashik Load Shedding : शहरात विजेचा लपंडाव सुरूच! महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.