NMC Recruitment: आस्थापना अट शिथिलतेच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना! सवलत मिळाल्यास महापालिकेत रिक्त पदांची भरतीचा मार्ग सुकर

Nashik News : अट शिथिलतेची सवलत नाशिक महापालिकेला मिळाल्यास रिक्त पदांची भरती करण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

नाशिक : संभाजीनगर महापालिकेला आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेलादेखील आस्थापना खर्चाची अट शिथिल करावी या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगर विकास विभागाने कारवाई सुरू केली आहे. अट शिथिलतेची सवलत नाशिक महापालिकेला मिळाल्यास रिक्त पदांची भरती करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. (Nashik Notice from CM of establishment condition relaxation NMC Recruitment marathi news)

महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने २०१७ मध्ये १४ हजार पदांचा आकृतिबंध शासनाला पाठविला. परंतु शासनाने व्यवहार्य तसेच नवीन सुधारित नियमावलीनुसार सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रशासनाने सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. आस्थापनेवरील मंजूर व नव्याने आवश्यक पदांचा संवर्गनिहाय पदांची माहिती ४९ विभागाकडून एकत्रित केल्यानंतर पदांचा आकृतिबंध १० हजारापर्यंत पोचला. हा आकृतिबंधदेखील जास्त असल्यामुळे पुन्हा तो नऊ हजार पदांच्या खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुसरीकडे आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यासाठी पुन्हा शासनाकडे धाव घेण्यात आली होती. शासनाच्या नगरविकास विभागाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेला आस्थापना खर्चात सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेकडूनही मागणी करण्यात आली.

जानेवारीत या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने नगर विकास विभागाचे सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी कारवाईला सुरवात केली आहे. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde
Raj Thackeray In Nashik: सत्ता हातात द्या मशिदीवरील सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरेंचे नाशिकमध्ये दमदार भाषण

शासनाच्या मंजुरीची अपेक्षा

राज्य शासनाने सुवर्ण महोत्सवी वर्षात ५५ हजार रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली होती. त्याअंतर्गत महापालिकेत अत्यावश्यक बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशामक विभागांसह अन्य तांत्रिक ७०६ पदे भरतीसाठी टीसीएस कंपनीला काम देण्यात आले.

‘अ’ वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळून प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. ३१ डिसेंबरला आस्थापना खर्च अट शिथिलतेची मुदत संपल्याने नौकर भरतीचा मार्ग बंद झाला. छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर महापालिकेने मागणी केल्यानंतर शासनाकडून मंजुरी मिळाल्यास भरती शक्य होणार आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेलादेखील आस्थापना अट शिथिल करण्याचे सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने कारवाई सुरू झाली असून, पुढील आठवड्यात निर्णय येईल."

- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

CM Eknath Shinde
Nashik Education Survey: 12 महाविद्यालयांनी शिक्षण सर्वेक्षणाची माहिती दिली नाही! शहरातील 8, ग्रामीणमधील 4 महाविद्यालयांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.