NMC News : धोकादायक, संवेदनशील ठिकाणी निश्चित करा; महापालिका आयुक्तांच्या विभागप्रमुखांना सूचना

NMC : धोकादायक व संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या.
NMC
NMCesakal
Updated on

NMC News : शहर व परिसरामध्ये अद्याप पुरेसा पाऊस झाला नसला तरी यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात होणारा पाऊस लक्षात घेता गोदावरी नंदिनी तसेच वालदेवी व इतर उपनद्यांच्या पुरामुळे यापूर्वी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन आणि झालेली धोकादायक व संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या. ( identify dangerous and sensitive places in city )

महापालिका आयुक्त करंजकर यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यात पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी शहरातील मुख्य नदी व उपनद्यांच्या पुरामुळे यापूर्वी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर धोकादायक व संवेदनशील ठिकाणी निश्चित करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या.

पूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पाणी, लाइट व स्वच्छता या सुविधांमध्ये अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना विद्युत व पाणीपुरवठा विभागाला दिल्या. आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतरित केलेल्या रहिवाशांना निवास व भोजनाची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागाने संपूर्ण यंत्रणा तातडीने उपलब्ध होईल. या अनुषंगाने रंगीत तालीम घेण्याच्या सूचना दिल्या. (latest marathi news)

NMC
Nashik NMC News : महापालिकेची पर्जन्ययागाची तयारी? जूनमध्ये पाऊस न पडल्यास चिंता

गोदाकाटावरील अतिक्रमणे हटवा

संभावित पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी तसेच नंदिनी व वालदेवी नदीच्या किनाऱ्यावरील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे काढण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाला देण्यात आल्या आहे. त्यापूर्वी नगर नियोजन विभागाने डीमार्केशन करावे. पूर ओसरल्यानंतर नदी काठावरील कचरा स्वच्छ करण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने २४ तास यंत्रणा सतर्क ठेवण्याची खबरदारी वैद्यकीय विभागाला घेण्याची सूचना देण्यात आली.

तुंबणाऱ्या गटारांवर उपाय

शहरात दरवर्षी पावसाळापूर्व कामे केली जातात. यंदाही कामे करण्यात आली, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ८० टक्के कामे झाल्याचा दावा करण्यात आला होता प्रत्यक्षात मात्र ६० टक्के कामे झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे पावसाळापूर्व कामातील फोलपणा उघड झाला. त्यामुळे देयके देण्याचे काम थांबविण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये पाणी साचणारे ठिकाणे, चौक, रस्ते या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील पावसाळी नाले व गटारींची स्वच्छता व साफसफाई झाली की नाही, याची तपासणी करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

NMC
NMC News : कंत्राटी कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी गेला कुठे? महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.