नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या शुक्रवारी (ता.८) जाहीर सभा होत आहे. सभेसाठी शहर-जिल्ह्यातून नागरिकांची मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाचा वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
सदरील बदल हे गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी असणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.