Nashik Assembly Election : विधानसभेच्या निवडणुकीत बूथची संख्या वाढणार; पारंपरिक केंद्रही ठरणार कालबाह्य

Nashik News : लोकसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवाच्या आधारे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रात वाढ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे.
Legislative Assembly
Legislative Assemblyesakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवाच्या आधारे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रात वाढ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. त्यामुळे सरासरी हजार ते एक हजार २०० मतदारांसाठी एक केंद्र निर्माण करण्याचे विचाराधीन आहे. (number of booths will increase in assembly elections)

विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी मतदान केंद्र असलेली ठिकाणेही बदलण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण चार हजार ८०० मतदान केंद्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अडीच मतदारसंघात त्यांची विभागणी करण्यात आली होती. मालेगाव मध्य, बाह्य व बागलाण हे तीन मतदारसंघ धुळे लोकसभेला जोडले आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दिंडोरीत लोकसभेसाठी एकूण एक हजार ९२२ मतदान केंद्र होते. तर नाशिक लोकसभेत सिन्नर, नाशिक पूर्व, मध्य, पश्‍चिम, देवळाली, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण एक हजार ९१० मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते.

नाशिक शहरात सर्वाधिक मतदान केंद्र असल्यामुळे या ठिकाणी अधिक मतदान होण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणे आवश्‍यक असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेषतः पारंपरिक ठिकाणीच मतदान केंद्र निर्माण केले जातात. त्या शाळांही आता जीर्ण होत चालल्या आहेत. पण केंद्र त्याच ठिकाणी राहिल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याचे दिसून येते. त्याऐवजी आता नवीन इमारती, सोसायट्यांचे हॉल, कार्यालयांमध्ये मतदान केंद्र निर्माण करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. (latest marathi news)

Legislative Assembly
Nashik Police Recruitment : भरतीला अनुपस्थितांना एक संधी! शहर आयुक्तालयातर्फे रविवार होणार मैदानी चाचणी

कमीत कमी वेळेत मतदान करून मतदार बाहेर पडले तर मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्‍चितपणे मदत होईल. सद्यःस्थितीला साधारणत: एक हजार ४०० मतदारांसाठी एक मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. ही संख्या कमी करून हजार ते एक हजार २०० मतदारांपर्यंत कमी केली तर मतदानप्रक्रिया गतिशील होईल आणि मतदानाची टक्केवारी वाढेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

येत्या तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक होत असल्याने त्याचा निश्‍चितपणे फायदा होईल आणि प्रक्रियाही सुरळीतपणे पार पडेल, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रात निश्‍चितपणे वाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते.

"लोकसभा निवडणुकीत जाणवलेल्या त्रुटी दुरुस्त करत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र वाढविण्याचा आमचा प्रस्ताव आहे. निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर त्यांची संख्या निश्‍चित होईल. पारंपरिक मतदान केंद्रही आपण बदलणार आहोत." - जलज शर्मा, जिल्हाधिकारी

Legislative Assembly
Nashik News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी 47 शेतकरी पात्र

तालुकानिहाय मतदान केंद्र

मालेगाव मध्य - ३४३

मालेगाव बाह्य - ३३७

बागलाण - २८८

नांदगाव - ३३१

कळवण - ३४५

चांदवड - २९६

येवला - ३२०

निफाड - २७३

दिंडोरी - ३५७

सिन्नर - ३२१

नाशिक पूर्व - ३२६

नाशिक मध्य - २९५

नाशिक पश्‍चिम - ४१०

देवळाली - २६९

इगतपुरी - २८९

एकूण - ४८००

Legislative Assembly
Nashik News : काश्‍यपी धरणग्रस्त आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार! धरणातील पाणी आरक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com