Nashik News : नाशिक शहरातील व्यावसायिक नर्सरी आता डिजिटल होणार असून, आपले पर्यावरण संस्था नर्सरीला मोफत झाडांची माहिती देणारा क्यूआर कोड देणार आहे. या माध्यमातून ऑक्सिजन देणारी झाडे कोणती, झाडांचे आयुर्वेदिक महत्त्वासह झाडांचे विविध उपयोग किंवा कोड स्कॅन करून नागरिकांना समजणार आहे. यातून नागरिकांना निसर्ग शिक्षण मिळणार असल्याची माहिती आपले पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांनी दिली आहे. (Nashik Nurseries in city will now digital)
सध्या नर्सरीमध्ये अनेक झाडे विकायला आहेत. नाशिक हे झाडांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. पावसाळ्यात नागरिकांचा ओढा नर्सरीकडे वाढला आहे. एका नर्सरीमध्ये किमान ५०० ते १००० प्रकारची झाडे असतात. मात्र या झाडांची माहिती देण्यासाठी व्यक्ती उपलब्ध नसतात. अनेक वेळा नागरिकांना झाडांची माहिती अपूर्ण मिळते.
देशी- विदेशी झाडे कोणती, झाडांचे पर्यावरणीय महत्त्व काय, ऑक्सिजन देणारी झाडे कोणती, कोणती झाडे कोणत्या प्रदेशात येऊ शकतात, झाडांना खत कोणते टाकावे, निगा कशी राखावी, पाणी कशाप्रकारे द्यावे, कोणत्या ऋतूमध्ये झाडांना फळ, फूल येते ही माहिती नागरिकांना आता नर्सरीमध्ये गेल्यावर झाडावर लावलेला क्यूआरकोड स्कॅन केल्यावर मिळणार आहे. (latest marathi news)
यासाठी आपले पर्यावरण संस्थेने झाडांची माहिती देणारे क्यूआर कोड तयार केले आहे. आंबा, फणस, वड, पिंपळ, चिकू, चिंच, पारिजात, लिंबू अशा अनेक देशी झाडांचे किंवा कोड तयार करून डिजिटलायझेशन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही सर्व प्रक्रिया आपले पर्यावरण संस्था मोफत करत आहे. लोकसाक्षरता आणि निसर्ग साक्षरतेसाठी हा अनोखा प्रयोग नाशिक शहरातल्या अनेक नर्सरीमध्ये राबवला जात आहे.
"पावसाळ्यात झाडे कोणती लावावी झाडांची संपूर्ण माहिती देणारे क्यूआर कोड नर्सरीला वाटप करण्यास सुरवात केली आहे. लोक व निसर्ग साक्षरता आणि लोकांना झाडांची सर्वांगीण माहिती मिळण्यासाठी हा प्रयोग आम्ही सुरू करीत आहोत. इच्छुकांनी संपर्क साधून क्यूआर कोड बनवून घ्यावा."- शेखर गायकवाड, आपले पर्यावरण संस्था.
"झाडांना लावलेला क्यूआर कोड स्कॅन करून नागरिक झाडाची संपूर्ण माहिती वाचू शकतात. या माध्यमातून लोकांना झाडांचे महत्त्व समजणार आहेत. आपण कोणती झाडे लावली पाहिजे, निसर्गाला अनुरूप आणि अनुकूल अशी झाडे कोणती आहेत हे क्यूआर कोड माध्यमातून नागरिकांना समजणार आहे. आपले पर्यावरण संस्थेने घेतलेला हा पुढाकार निसर्ग साक्षरतेसाठी आहे. यात कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन नाही."- विजय जाधव, नर्सरी मालक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.