Nashik Citylink Bus : ‘सिटीलिंक’ चा पाय खोलात; वाहक पुरवठादार कंपनी विरोधात आक्षेप

Nashik News : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीने ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवा सुरू केली. कंपनीच्या माध्यमातून शहरात २०० सीएनजी तर ५० डिझेल बस धावतात.
Citylink Bus
Citylink Busesakal
Updated on

Nashik News : आचारसंहितेच्या काळातही वाहक पुरवठादार कंपनी नियुक्त करण्यासाठी सिटीलिंक कंपनीने खुल्या केलेल्या फायनान्शिअल बीड विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार झाल्यानंतर आता सिटीलिंक कंपनीने अनुभव नसतानाही एमपीएस कंपनीला वाहक पुरवठा करण्याचे काम देण्याचा निर्णय घेतल्याने त्या विरोधात पात्र ठरूनही काम नाकारलेल्या एलएनके कंपनीने स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकायांकडे आक्षेप नोंदविला आहे.

महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीने ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवा सुरू केली. कंपनीच्या माध्यमातून शहरात २०० सीएनजी तर ५० डिझेल बस धावतात. बससाठी वाहक पुरवठादाराचे काम आऊटसोर्स करण्यात आले आहे. ठेकेदाराकडून नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधी रक्कम अदा न करणे.

कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक दंडात्मक कारवाई या कारणांमुळे आत्तापर्यंत दहा वेळेस संप झाला. वाहक पुरवठादार कंपनीचे काम करारानुसार ७ जुलैला संपुष्टात येत आहे. (latest marathi news)

Citylink Bus
Nashik Malnutrition Relief : कुपोषणमुक्तीसाठी प्रत्येक तालुक्यात आता किलबिल मेळावे!

लोकसभा व विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा खुल्या केल्या नाहीत. परंतु त्यापूर्वीच सिटीलिंक कंपनीने फायनान्शिअल बीड खुले केले. त्यात तीन कंपन्या अपेक्षित असताना एमपीएस व एलएनके या दोन कंपन्यांनी सहभाग घेतला.

यात दर कमी असल्याने एमपीएस या कंपनीला जवळपास काम देण्याचे निश्‍चित झाले आहे. परंतु अनुभव नसल्याने कंपनी विरोधात एलएनके वाहतूक पुरवठादार कंपनीने आक्षेप नोंदविला आहे. या आक्षेपावर कारवाई झाल्यास सिटीलिंक सेवा बंद करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

Citylink Bus
Nashik Teacher Constituency : विधान परिषदेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा! सलग 26 तासांच्या मतमोजणीनंतर किशोर दराडे विजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com