Nashik Unauthorized Hoardings : शहराचे विद्रुपीकरण! वाहतूक बेटांवर फलकबाजी; वाहतुकीला अडथळा

Unauthorized Hoardings : शहर परिसरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डिंगचे अक्षरश: पीक आले आहे. काही होर्डिंग्ज तर थेट वाहतूक बेटांवर लावण्यात आले आहेत.
Unauthorized Hoardings
Unauthorized Hoardingsesakal
Updated on

नाशिक : शहर परिसरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डिंगचे अक्षरश: पीक आले आहे. काही होर्डिंग्ज तर थेट वाहतूक बेटांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तर काही होर्डिंग्जमुळे जीवघेणा अपघात होण्याचीही शक्यता बळावली आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात येऊन संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाईची मागणीच जागरुक वाहनचालक, नागरिकांनी केली आहे. ( Obstructing traffic due to unauthorised hoardings on traffic board )

नवरात्रोत्सव सुरू असून, आगामी विधानसभा निवडणुकींमुळे इच्छुकांनी शहरभर फलकबाजी सुरू केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्ताने उपनगरांमध्ये रासदांडियाचे आयोजन केले असून, नवरात्रोत्सवाचे नागरिकांचा शुभेच्‌छा फलक शहरात जागोजागी लावण्यात आले आहेत. या भर वाढदिवसांच्या होर्डिग्जही चौका-चौकांमध्ये अनधिृकतरित्या लावण्यात आलेले आहेत.

चौकांमधील दुभाजकही अशा अनधिकृत होर्डिंगपासून सुटलेले नाहीत. अशाठिकाणी होर्डिग्ज लावल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना होतो आहे. शहराती काही वाहतूक बेंटांवरही अनधिकृतरित्या होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत. यामुळे शहराच्या सौदर्यांचे विद्रुपीकरण होते आहे. वाहतूक बेटांवरील होर्डिग्जमुळे वाहनचालकांना चौकातून विरुद्‌ध बाजुकडून येणारी वाहने दिसत नाहीत.

Unauthorized Hoardings
Unauthorized Hoardings : उल्हासनगरात अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या जागा व एजन्सी मालकांवर गुन्हे

त्यामुळे भीषण स्वरुपाचा अपघातही होऊ शकतो. परंतु वाहतूक पोलीसांकडून अशी धोकादायक होर्डिंग्ज हटविण्यात आलेली नाही अथवाही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जागरुक नागरिक-वाहनचालकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत असे होर्डिंग्ज पोलिसांनी हटवावी, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाईचीही मागणी केली आहे.

कमानींवर फलकबाजी

नवरात्रोत्सवाचे अनधिकृत होर्डिग्ज वाहतूक बेटांवर लावलेले असताना वाढदिवसांचे फलक थेट महापालिकेच्या दिशादर्शक कमानींवर लावण्यात आलेले आहेत. शहरातील जवळपास सर्वच कमानींवर असे अनधिकृत बॅनरबाजी करण्यात आली असून, त्यावर मनपाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे आशचर्य व्यक्त होते आहे.

Unauthorized Hoardings
NMC on Unauthorized Hoarding : एसटी महामंडळाकडून होर्डिंग उतरविण्याची कार्यवाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.