Nashik Flowers News : सणानिमित्त झेंडूची फुले गाठणार शंभरी! यंदा चांगला भाव मिळण्याची उत्पादकांना अपेक्षा

Latest Nashik News : गणेशोत्सवात ७० ते ८० रुपये किलोने फुलांना भाव मिळाला. आगामी दसरा-दिवाळीत झेंडूची फुले शंभरी गाठतील असा अंदाज फूल उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.
Blooming flower garden against the background of Diwali Dussehra
Blooming flower garden against the background of Diwali Dussehraesakal
Updated on

मालेगाव : गणेशोत्सवापासून फूल व्यवसाय तेजीत आला आहे. आगामी नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळीच्या पाश्‍र्वभूमीवर शेतकऱ्यांनी झेंडूसह इतर फुलांची लागवड केली आहे. बियाणे, मजुरी व इतर खर्च वाढल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी लागवडीचे प्रमाण काहीसे कमी आहे. गणेशोत्सवात ७० ते ८० रुपये किलोने फुलांना भाव मिळाला. आगामी दसरा-दिवाळीत झेंडूची फुले शंभरी गाठतील असा अंदाज फूल उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. (marigold flowers will reach 100)

नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने चांदवड तालुक्यात फुलांची शेती केली जाते. कळवण, पेठ, सुरगाणा या आदिवासी पट्ट्यातही फुलांचे उत्पन्न घेतले जात आहे. जवळपास प्रत्येक तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात का होईना फुलांचे उत्पन्न घेतले जाते.

किरकोळ अपवाद वगळता बहुतांशी शेतकरी दसरा-दिवाळी हे दोन प्रमुख सण डोळ्यासमोर ठेवून उत्पादन घेत असतात. गणेशोत्सवापासून फूल व्यवसाय बहारात येतो. लाल व पिवळा अशा दोन प्रकारचे झेंडूचे उत्पन्न घेतले जाते. झेंडूचे पीक साधारणत: दीड महिन्यात येते. शेतीची मशागत, खते व बागेची निगा राखल्यास महिन्यात देखील फुले येतात.

महाराष्ट्रातील हिंगोली व मध्यप्रदेशमधील रतलाम येथे मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पन्न घेतले जात आहे. सणासुधीला बाहेर गावाहून फूल विक्रीला आल्यास स्थानिक बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित किंमत मिळत नाही. सध्या फुलशेती बहरली आहे. साधारणत: नवरात्रोत्सवापासून फुले काढण्यास सुरुवात होईल. या वर्षी दसरा-दिवाळीत ७० ते ८० रुपये तर किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोपर्यंत झेंडूच्या फुलांना भाव मिळेल असा अंदाज व्यापाऱ्यांकडून देखील वर्तविला जात आहे. (latest marathi news)

Blooming flower garden against the background of Diwali Dussehra
Dhule Employment Fair : जिल्ह्यात 24 अन्‌ 30 ला रोजगार मेळावा; मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

बियाणे महागले

गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी फुलशेती केली. मात्र ऐन दसरा, दिवाळीतच भाव पडल्याने अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. गेल्यावर्षी एक हजार बी असलेल्या झेंडूच्या बियाणांचे पाकिट २२०० ते २५०० रुपयांना मिळत होते. यावर्षी ते ३००० ते ३३०० रुपयांपर्यंत महागले. बियाणे व मजुरी महागली. भावाची शाश्‍वती नसल्याने पाणी असूनही अनेक शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात लागवड केली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

"झेंडूंच्या भावात चढ-उतार होत असतो. ऐन तोडणीच्या वेळी बेमोसमी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होते. तसेच भावातही घसरण होत असते. प्लास्टिक फुलांच्या मागणीमुळे देखील काही प्रमाणात परिणाम होतो. यावर्षी लागवड घटल्याने दसरा, दिवाळीत चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे." - शिवाजी मोरे, देवगाव, चांदव

Blooming flower garden against the background of Diwali Dussehra
SAKAL Exclusive : 40 हजार वॉटर बँकेतून कोरडवाहू शेती झाली बागायती! नाशिक जिल्ह्यात शेततळ्याने आणली क्रांती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.