Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: बाजारपेठ उजळली निळ्या रंगाने ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तयारी वेग, दुकाने सजली

Nashik News : रविवारी (ता.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. सर्वत्र तयारीस वेग आला आहे.
Citizens buying flags on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Citizens buying flags on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayantiesakal
Updated on

जुने नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने बाजारपेठ सजली आहे. झेंडे, पताका, चमकी अशा विविध वस्तू बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. संपूर्ण बाजारपेठ निळ्या रंगांच्या वस्तूंनी उजळून निघाली आहे. झेंडे आणि बॅच यांची अधिक मागणी आहे. (Nashik Dr Babasaheb Ambedkar Jayanti marathi news)

रविवारी (ता.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. सर्वत्र तयारीस वेग आला आहे. बाजारपेठेत झेंडे, मफलर, टोपी, फेटे अशा विविध वस्तू विक्रीस दाखल झाल्या आहेत. बाजारपेठ जयंतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी उजळून निघाली आहे. ठिकठिकाणी वस्तू विक्रीची दुकाने लागली आहेत.

तरुणांकडून या वस्तू विशेषत: मोठ-मोठे झेंडे खरेदीकडे विशेष आकर्षण दिसत आहे. त्याचप्रमाणे ‘जय भीम’ लिहिलेली रिबीन, कागदी, कापडी, प्लास्टिक पताका, आकाश कंदील, काठ्या यांचीही मागणी वाढली आहे. जयंती तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वस्तूंच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे. शहराच्या विविध भागांसह विशेषत: भद्रकाली मार्केट या ठिकाणी जयंतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर आहे. शहर जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळ आणि तरुण या वस्तू खरेदीसाठी भद्रकाली मार्केटमध्ये गर्दी करत आहेत.

Citizens buying flags on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Nashik Hanuman Jayanti: जगातील सर्वांत मोठी हनुमान जयंती अंजनेरीत! हनुमान जन्‍मस्‍थान संस्‍थानतर्फे 23 ला महाआरती सोहळा

लहान, मोठे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले झेंडे यांना अधिक मागणी आहे. सार्वजनिक मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. रस्ते, चौक ठिक-ठिकाणी झेंडे, पताका कमानी उभारण्यासह विविध तयारीस वेग आला आहे.

असे आहे दर

वस्तू........................दर

स्टिकर.....................१० ते २०

रिबिन.....................३० रुपये बंडल

झेंडे.......................२० ते ९५०

बॅच.......................१० ते ४०

पताका कागदी.................२० रुपये पाकीट

पताका कापडी.................४० रुपये पाकीट

पताका प्लास्टिक.................६० रुपये पाकीट

टोपी........................१० ते ४०

फेटा........................१०० ते ५५०

मफलर.......................२० ते ७०

चमकी.......................१५० रुपये बंडल

आकाश कंदील..................६० ते ४५०

तोरण........................६० ते २५०

शिका संघटित व्हा पडदा १० फूट......६५०

Citizens buying flags on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Nashik Startups News : वर्षभरात स्‍टार्टअप्‍स्‌मध्ये 20 कोटींपर्यंत गुंतवणूक; पुढील 5 वर्षांत अडीचशे स्‍टार्टअप्‍सना आर्थिक बळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.