Nashik ZP News : पदभरतीच्या प्रारूप निवडयाद्या संकेतस्थळावर; पुढील आठवड्यात कागदपत्रांची पडताळणी

Nashik News : जिल्हा परिषदेच्या अधिनस्त गट-क च्या विविध संवर्गातील पदांच्या पदभरतीसाठी ऑक्टोबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ यादरम्यान घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल नाशिक कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
Nashik ZP News : पदभरतीच्या प्रारूप निवडयाद्या संकेतस्थळावर; पुढील आठवड्यात कागदपत्रांची पडताळणी
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या अधिनस्त गट-क च्या विविध संवर्गातील पदांच्या पदभरतीसाठी ऑक्टोबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ यादरम्यान घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल नाशिक कार्यालयाला प्राप्त झाला आहे. (Nashik office has received results of online examination conducted for recruitment of posts in various cadres of Zilla Parishad)

त्या निकालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सहा संवर्गाच्या प्रारूप निवड आणि प्रतीक्षा याद्या शनिवारपासून (ता. १३) जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर पुढील आठवड्यात निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

कनिष्ठ सहायक (लेखा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/बांधकाम/ग्रापापु), वरिष्ठ सहायक, औषधनिर्माण, स्थापत्य संवर्गाच्या प्रारूप निवड व प्रतीक्षा याद्या १३ जुलैपासून जिल्हा परिषेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (latest marathi news)

Nashik ZP News : पदभरतीच्या प्रारूप निवडयाद्या संकेतस्थळावर; पुढील आठवड्यात कागदपत्रांची पडताळणी
Nashik Police: ॲकॅडमीच्या संचालकांना पोलिसांचा दणका! जल्लोष भोवला; दोघांविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

पशुधन पर्यवेक्षक (पेसा-नॉन पेसा) या संवर्गाच्या प्रारूप निवडयादी प्रसिद्धीचे कामकाज सुरू असून, लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (ऊ.श्रे.), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक.

विस्तार अधिकारी (शिक्षण) या सात संवर्गात सामाजिक/समांतर आरक्षण व गुणानुक्रमाप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांची प्रारूप निवडयादी व प्रतीक्षा यादीनुसार उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी झाली असून, अंतिम निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्याचे कामकाज सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनातर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

Nashik ZP News : पदभरतीच्या प्रारूप निवडयाद्या संकेतस्थळावर; पुढील आठवड्यात कागदपत्रांची पडताळणी
Nashik News : सिन्नरमधील 40 रस्त्यांचे भाग्य उजळणार; तब्बल 70 कोटींचा निधी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.