Nashik: लासलगावला दामदुपटीच्या आमिष प्रकरणी संशयितांचे कार्यालय ‘सील’! धाराशिव जिल्ह्यातील संशयितास ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न

Latest Crime News : यात महत्त्वाचा घटक म्हणजे या योजनेसाठी डबलचे आमिष दाखविणाऱ्यांनी नेमलेले एजंट यांचीही आता पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
While inspecting the office on Station Road in Lasalgaon, Deputy Superintendent of Police Dr. Nilesh Palve
While inspecting the office on Station Road in Lasalgaon, Deputy Superintendent of Police Dr. Nilesh Palveesakal
Updated on

लासलगाव : दामदुपटीच्या आमिषाने लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोन संशयितांचे स्टेशन रोडवरील कार्यालय पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी (ता. ७) दिवसभर तपासणी केली. तपासणीनंतर कार्यालय ‘सील’ करण्यात आले. (office of suspect in case of double money bait to Lasalgaon sealed)

दामदुपटीचे आमिष दाखवून गंडा घातला, अशा आशयाची बातमी वृत्तपत्रांत झळकताच पोलिस प्रशासनाने तत्काळ कार्यालयाचा ताबा घेऊन निफाडचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे व लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या पथकाने कार्यालयची तपासणी करून महत्त्वाची कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेतली. तपासणीनंतर कार्यालय ‘सील’ केले.

लासलगाव परिसरात या योजनेखाली पैसे टाकण्यासाठी प्रामुख्याने गोल्ड लोनचा वापर केला असून, त्यांच्याकडे जेवढे सोने ठेवले, त्याचे डबल सोने दिलेल्या मुदतीत मिळण्याच्या आशेवर ठेवल्याची चर्चा आहे. तसेच, लासलगाव परिसरातील खासगी सरकारी बँका, पतसंस्थांमधील ठेवी काढून घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. (latest marathi news)

While inspecting the office on Station Road in Lasalgaon, Deputy Superintendent of Police Dr. Nilesh Palve
Nashik Crime News : जॉय रायडिंगसाठी चोरल्या दुचाकी; विधीसंघर्षित बालकांकडून 11 दुचाकी हस्तगत; म्हसरूळ पोलिसांची कामगिरी

यात प्रामुख्याने विधवा महिला, माहेरवाशीण, लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आदींची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे दिसून येते. यात महत्त्वाचा घटक म्हणजे या योजनेसाठी डबलचे आमिष दाखविणाऱ्यांनी नेमलेले एजंट यांचीही आता पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

"लासलगाव पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता पोलिस सर्व शक्यता तपासत आहेत. लवकरच न्यायालयामार्फत धाराशिव जिल्ह्यातील गुन्ह्यात एकास अटक झालेली आहे. त्याचा तपासकामी ताबा घेण्यासाठी अटक वॉरंट प्राप्त करीत आहोत. तसेच, दुसऱ्या संशयितास ताब्यात घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत."

- डॉ. नीलेश पालवे, पोलिस उपअधीक्षक, निफाड

While inspecting the office on Station Road in Lasalgaon, Deputy Superintendent of Police Dr. Nilesh Palve
Nagpur Crime News: 'तो' मारत सुटला, दोघांचा जीव घेतला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.