Nashik News : जिल्ह्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी असले, तरी मागील काही वर्षांचा इतिहास पाहता गोदाकाठालगत असलेल्या गावांना पुराचा वेढा बसला आहे. तसेच, दरड कोसळण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे आपत्तीच्या काळात विभागप्रमुखांनी आपले मुख्यालय सोडू नये, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. (Officials are banned from leaving headquarters)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २६) जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत महसुली कामांचा आढावा घेतला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपस्थित होते.
या वेळी पारधे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत सूचना देताना सांगितले, की पावसाळ्याच्या दिवसांत अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सोडू नये. पावसाने कुठे नुकसान झाले असल्यास तेथे जाऊन तत्काळ पंचनामे करावेत आणि त्याचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत.
तालुकानिहाय पावसाचे प्रमाण, संभाव्य पूरपरिस्थिती व केलेल्या नियोजनाची माहिती तत्काळ कळवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्ती आणि जनावरांचे वेळेत स्थलांतर करण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (latest marathi news)
पाऊस ओसरला, विसर्ग घटला
शुक्रवारी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होताच दारणा, नांदूरमध्यमेश्वर या धरणातून होणारा विसर्ग घटला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सात हजार ९२४ क्यूसेक वेगाने सध्या पाणी सोडले जात आहे.
या धरणाचा विसर्ग सायंकाळी सहाला १२ हजार ६९३ क्यूसेकने कमी करण्यात आला; तर ‘दारणा’तून पाच हजार २७२ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यात तीन हजार ७४४ क्यूसेक इतकी घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.