Nashik Agricultural News : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ दरवर्षी आधारभूत किंमत योजनेंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्य खरेदी केली जाते. मात्र, या खरेदीत गैरप्रकार झाल्याचे मागील काही दिवसात उघडकीस आले होते. त्या पार्श्वभूमीवर महामंडळाने धान खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी कंबर कसले असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक पाहणी व समुपदेशन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. (Officials will go directly to farm field to buy grains)