Nashik News : ऑफलाइन देयकांना 12 एप्रिलपर्यंत मुभा; मार्चअखेरची बिले मंजुरीसाठी मुदतवाढ

Nashik : ग्रामविकास विभागाने २०२२-२३ या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या निधीतील कामांची देयके ऑफलाइन पद्धतीने देण्यासाठी १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
cash payment
cash payment esakal
Updated on

Nashik News : ग्रामविकास विभागाने २०२२-२३ या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या निधीतील कामांची देयके ऑफलाइन पद्धतीने देण्यासाठी १२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत मंजूर न झालेली देयके आता ऑफलाइन पद्धतीने देता येणार आहेत. यामुळे कमी खर्च झालेल्या विभागांना त्यांच्याकडील देयके ऑफलाइन पद्धतीने मंजूर करून निधी खर्च करण्यास वाव मिळाला आहे. (Nashik Offline payments allowed till April 12 marathi news)

ग्रामविकास विभागांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या देयकांसाठी ‘जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम’ या ऑनलाइन प्रणालीचा वापर केला जातो. प्रत्येक आर्थिक वर्षासाठीच्या ऑनलाइन देयकांची ही प्रणाली ३१ मार्चला बंद होत असते. जिल्हा परिषदेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंजूर झालेला व प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदत होती. (latest marathi news)

cash payment
Nashik News : भालूरच्या विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांसाठी पाणपोई! टाकाऊ वस्तूंपासून झाडांवर पाणवठे

यामुळे त्या आर्थिक वर्षातील मंजूर झालेल्या कामांची देयके ३१ मार्चच्या रात्री बारापर्यंतच या ‘झेडपीएफएमएस’ प्रणालीद्वारे देता येणे शक्य होते. मात्र, नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे गेल्या वर्षीतील मंजूर झालेल्या व ३१ मार्चपर्यंत पूर्ण झालेल्या कामांची देयके ऑनलाइन पद्धतीने देता येणे शक्य होणार नाही. यामुळे कामे पूर्ण झालेली असतील व केवळ वेळेत देयके सादर न झाल्याच्या कारणामुळे निधी परत जाऊ शकतो.

यासाठी ग्रामविकास विभागाने २०२२-२३ या वर्षात मंजूर झालेल्या व ३१ मार्चपर्यंत पूर्ण झालेल्या कामांची देयके सादर करून ती ऑफलाइन पद्धतीने मंजूर करून देयके देण्याची मुदत १२ एप्रिल २०२४ पर्यंत वाढवली आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांकडून मंजूर होऊन पूर्ण झालेल्या कामांची देयके आता १२ एप्रिलपर्यंत स्वीकारली जाणार आहेत, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी सांगितले.

cash payment
Nashik News : डोंगरदऱ्यांत बहरताहेत करवंद! इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना हक्काचा रोजगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.