Nashik News : जुने नाशिकला जिवंत झऱ्यांचा वारसा; टंचाईमध्ये नागरिकांना पाण्याचा मिळतोय आधार

Nashik : पुरातन काळापासून जुने नाशिक परिसराला जिवंत पाण्याच्या झऱ्यांचा वारसा लाभलेला आहे.
Flowing water from the living spring in the wall of the municipal school premises at Gadge Maharaj Math.
Flowing water from the living spring in the wall of the municipal school premises at Gadge Maharaj Math.esakal
Updated on

Nashik News : पुरातन काळापासून जुने नाशिक परिसराला जिवंत पाण्याच्या झऱ्यांचा वारसा लाभलेला आहे. विविध ठिकाणी आजही पाण्याचे झरे असून पाणी टंचाईच्या काळात ते रहिवाशांसाठी जीवनदायी ठरत आहेत. इतकेच नाही तर गोदावरी नदी पात्रातही असे झरे पहावयास मिळतात. नैसर्गिक पाण्याचे स्रोत अर्थात कुठल्याही प्रकारची पाइपलाइन नसताना जमिनीतून पाणी येते. त्यास जिवंत झऱ्याचे पाणी असे म्हटले जाते. (legacy of living springs is providing water support to citizens in times of scarcity )

जुने नाशिक परिसरात अशा जिवंत पाण्याच्या झऱ्यांचा वारसा लाभलेला असून बदलत्या काळानुरूप वाढीव बांधकाम, जमिनीचे कॉंक्रिटीकरण, मोठ-मोठ्या पाइपलाइन, पावसाळी गटारीचे काँक्रिटीकरण बांधकाम यामुळे काही झरे लुप्त झाले आहेत. काही भागात आजही झरे वाहत आहेत. गाडगे महाराज मठास लागून असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या आवारातील भिंतीस, काझीगढीच्या पायथ्याशी तसेच गोदावरी नदी पात्रात खळखळून वाहणारे जिवंत पाण्याचे झरे दिसून येतात.

पाणीटंचाईच्या काळात या झऱ्यांचे पाणी रहिवासी वापरासाठी घेऊन जातात. भांडी, कपडे धुण्यासह स्वच्छतेसाठी या पाण्याचा वापर केला जातो. काही वर्षांपूर्वी शहरात प्रचंड पाणीटंचाई झाली होती. ४५ वर्षांनंतर प्रथमच गंगा गोदावरीही कोरडी पडली होती. त्यावेळेस याच झऱ्यांच्या माध्यमातून पिण्यासह वापरासाठी पाण्याचा उपयोग केला गेला. नदीतील झाल्यामुळे पात्रात पाणी खळखळत दिसले. गाडगे महाराज मठाजवळील झरे आजही मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. (latest marathi news)

Flowing water from the living spring in the wall of the municipal school premises at Gadge Maharaj Math.
Nashik News : चाराटंचाईची धाग वाढली! सिन्नर, चांदवड, येवला, नांदगावमध्ये भीषण स्थिती; पशुपालक अडचणीत

परिसरातील रहिवासी त्याठिकाणी कपडे धुण्यासाठी येतात. तर काही तरुण, रिक्षा दुचाकी धुण्याचा व्यवसाय याच पाण्यावर करत आहेत. त्यामुळे त्यांना त्या झऱ्यांमुळे रोजगार उपलब्ध होण्यासही मदत झाली आहे. शनिवारी (ता.२५) महापालिकेकडून शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला होता. अशावेळी परिसरातील बहुतांशी रहिवाशांनी घरकामासाठी गाडगे महाराज मठ येथील झऱ्याचेच पाणी भरून नेल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

झऱ्याच्या नावाने परिसराची ओळख

नानावली परिसरातील नागझिरा परिसरास येथील जिवंत पाण्याच्या झऱ्यामुळे नागझिरा असे नाव पडले आहे. त्याठिकाणी पूर्वी मोठा झरा होता. संपूर्ण परिसराचे त्यावर जीवनमान अवलंबून होते. जनावरेही मोठ्या प्रमाणावर पाणी पिण्यासाठी त्याठिकाणी येत. काही वर्षांपूर्वी झऱ्याच्या जागी मोठी ड्रेनेज पाइपलाइन टाकून कॉंक्रिटीकरण करण्यात आले. त्यात झरा पूर्णपणे लुप्त झाला. असे असले तरी आजही तो परिसर झऱ्याच्या नावानेच ओळखला जातो.

Flowing water from the living spring in the wall of the municipal school premises at Gadge Maharaj Math.
Nashik News : शहरात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची दहशत; नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.