Akshay Tritiya 2024 : स्वप्नातील वाहनासाठी नाशिकरांनी साधला मुहूर्त; 20 ते 25 कोटींची उलाढाल

Nashik News : आपल्या स्वप्नातल्या आवडत्या वाहनांची खरेदी करत साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधला.
purchase of vehicles (file photo)
purchase of vehicles (file photo)esakal
Updated on

नाशिक : अक्षयतृतीयेनिमित्त ऑटोमोबाईल क्षेत्रात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. आपल्या स्वप्नातल्या आवडत्या वाहनांची खरेदी करत साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधला. शहर-परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांची दालने शुक्रवारी (ता. १०) सकाळपासून ग्राहकांनी गजबजले होते. (On occasion of Akshaya Tritiya purchase of vehicles from citizens)

वाहन खरेदीतून सुमारे वीस ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रिक, सीएनजी वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. अक्षयतृतीयेला आपल्याला आपले आवडते वाहन ताब्यात मिळावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून कंपन्यांच्या दालनात ग्राहकांची रेलचेल होती. मुहूर्तावर आपले वाहन घरी नेण्यासाठी अनेकांनी एक दिवस आधीच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या होत्या.

विशेषतः चारचाकी वाहनांच्या खरेदीचा जोर अधिक बघायला मिळाला. यासह दुचाकी, स्पोर्ट्स बाईक, तसेच विविध श्रेणीतील वाहन खरेदीला प्रतिसाद मिळाला. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे अनेक ग्राहकांनी सीएनजी किट असलेले किंवा इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर भर दिल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक बाजारात ग्राहकांची धूम

नाशिकरांनी अक्षयतृतीयेला गृहोपयोगी, तसेच चैनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करत सणाचा आनंद द्विगुणित केला. शहरातील सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली. कोट्यवधींची उलाढाल इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीतून झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (latest marathi news)

purchase of vehicles (file photo)
Akshay Tritiya 2024 : अक्षय तृतीया आणि पुराणातील या गोष्टींचा आहे थेट संबंध, जाणून घ्या बरंच काही...

टीव्ही, फ्रीज, एसी आदी गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसह मोबाईल, लॅपटॉप, टॅब, स्मार्टवाच यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटची खरेदी केली. सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या भरघोस डिस्काऊंटचा लाभ घेत ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक बाजारात चांगलीच धूम केली.

रील अन् सेल्फीसाठी धडपड

सध्या कुठलीही वस्तू खरेदी केली, की त्याचे फोटो रील सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वाहने, मोबाईल खरेदी करताना विशेषतः तरुणाईने आपण खरेदी केलेली वस्तू ताब्यात घेतानाचे फोटो रील शूट करून सोशल मीडियावर टाकण्यासाठी धडपड पाहायला मिळाली.

"अक्षयतृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांनी उत्साहाने आपले आवडते वाहन घरी नेले. आपले चारचाकीचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. सायंकाळपर्यंत वाहनांचे वितरण सुरू होते." - समकीत शाह, संचालक, जितेंद्र मोटर्स

purchase of vehicles (file photo)
Akshay Tritiya 2024 : अक्षय तृतीयेला धनप्राप्तीसाठी करा हे 6 सोपे उपाय, पैशांची चणचण होईल दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.