Nashik News : सनद लावण्यासाठी रुग्णालयांची धावपळ; आजपासून तपासणी मोहीम

Nashik : कोरोनाकाळात रुग्णांची लुट होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रुग्ण व नातेवाईकांसाठी रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
doctor
doctor esakal
Updated on

Nashik News : कोरोनाकाळात रुग्णांची लुट होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रुग्ण व नातेवाईकांसाठी रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु बहुतांश रुग्णालयाकडून नियमांची अंमलबजावणी झाली नाही. महापालिका वैद्यकीय विभागाने नोटिसा बजावण्यास सुरवात केल्यानंतर बहुतांश रुग्णालयांनी सनद व रुग्णसेवेचे दर दर्शनी भागात लावण्यास सुरवात केली आहे. (nashik On site inspection of hospitals will be conducted from today marathi news)

सनद, दर लावताना छोटे आकारमानाच्या किंवा निदर्शनास येणार नाही अशा पद्धतीने लावल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने शनिवार (ता. १३) पासून रुग्णालयांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. कोरोनाकाळात रुग्ण व नातेवाइकांची आर्थिक लुट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राज्य शासनाने आचारसंहिता लागू केली. त्यात दरपत्रक व रुग्ण सनद दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार बहुतांश रुग्णालय प्रशासनाकडून नियमाची अंमलबजावणी झाली. कोविडनंतर मात्र संहिता व रुग्ण सेवेचे दरपत्रक गायब झाल्याने महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तीनदा दर्शनी भागावर दरपत्रक लावण्याची नोटीस बजावली. मात्र त्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने ८ एप्रिलपासून नऊ निकषांच्या आधारे तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर महापालिका हद्दीतील जवळपास साडेसहाशे रुग्णालयापैकी बहुतांश रुग्णालय प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरु झाली. परंतु अद्यापही पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही तर काही ठिकाणी दिसणार नाही अशा पद्धतीने सनद लावल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्याने नऊ निकष न पाळणाऱ्या रुग्णालयांची झाडाझडती सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट नुसार रुग्णहक्क दर पत्रक न लावणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात तक्रार करण्यासाठी १८००२३४२४९ या टोल फ्री क्रमांक वर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (latest marathi news)

doctor
Nashik News : वसंत व्याख्यानमालेचा खर्च 50 लाखाच्या घरात; वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीकांत बेणी यांची माहिती

हे आहेत नऊ निकष

- रुग्ण हक्क सनद.

- रुग्ण उपचार दर पत्रक.

- नगर रचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र.

- जैविक घनकचरा विल्हेवाट प्रमाणपत्राचे ना हरकत दाखला.

- अग्निशमन ना हरकत दाखला व फायर ऑडिट.

- महापालिकेचे घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याचा दाखला.

- प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा ना हरकत दाखला.

- इलेक्ट्रिकल ऑडिट.

- रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेसची संख्या.

''रुग्णालयाकडून सनद व दर पत्रक लावण्याची अंमलबजावणी सुरु झाली असली तरी त्यासंदर्भातही तक्रारी असल्याने तपासणी व ज्या रुग्णालयांमध्ये अद्यापही सूचनेची अंमलबजावणी झाली नाही त्यासंदर्भात तपासणी सुरु केली जाणार आहे.''- डॉ.प्रशांत शेट्ये, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी.

doctor
Nashik News : जिल्ह्यात सोमवारपासून ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान; 100 कोटी लिटर क्षमता वाढविण्याचा निर्धार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()