Nashik News : भुजबळ फार्म हाऊसवर ड्रोनप्रकरणी एकाला अटक

Nashik : सिडकोतील भुजबळ फार्म हाऊसवर अचानक आलेल्या ड्रोनमुळे एकच खळबळ उडाली होती.
drone
droneesakal
Updated on

Nashik News : सिडकोतील भुजबळ फार्म हाऊसवर अचानक आलेल्या ड्रोनमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबड पोलिसांनी तपास करीत एका फोटोग्राफरला ताब्यात घेतले होते. संशयित फोटोग्राफरने लग्नाचे शुटिंगच्या वेळी त्याच्याकडून चुकून ड्रोन भुजबळ फार्महाऊसकडे गेल्याचे पोलिसात तपासातून समोर आले आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ याचे भुजबळ फार्महाऊस निवासस्थान असून, सद्यस्थितीमध्ये येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त असतो. (Nashik One arrested in case of drone at Bhujbal Farm House in cidco marathi News )

पवन राजेश सोनी (२९, रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा) असे संशयित फोटोग्राफरचे नाव आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्महाऊस येथील पॅलेसवर गेल्या शुक्रवारी (ता.५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक ड्रोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळता अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ड्रोनच्या माध्यमातून ‘रेकी’ केल्याचा संशय व्यक्त केला होता.

याप्रकरणी अंबडचे सहायक पोलिस निरीक्षक किरण रौंदळ यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास अंबड पोलिसांसह शहर गुन्हे शाखेच्या पथकाकडूनही सुरू होता. तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू असताना तपास पथकाने संशयित पवन सोनी याने ड्रोन उडविल्याचे समोर आले असता, त्यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. (latest marathi news)

drone
Nashik Crime News : नाशिकरोडच्या सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

यात त्याने लग्नसराईमुळे ड्रोनद्वारे शूटिंग करताना ते अधिक उंचावर गेले आणि ते भुजबळ फार्म हाऊसकडे चुकून गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विनापरवानगी ड्रोन उडविल्याचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल झाला आहे. याप्रकरणी तपास करून त्यास न्यायालयात हजर राहण्यासंदर्भातील नोटीस बजाविल्याचे अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले आहे.

प्रकरण संवेदनशिल

मंत्री छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून महायुतीचे संभाव्य उमेदवार आहेत. तसेच, मराठा आरक्षणावरून मंत्री भुजबळ यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. त्यांना अनेकदा धमक्याचे फोन व पत्रही आलेले आहेत. त्यामुळे भुजबळ फार्म हाऊस येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. त्याच त्यांच्या निवासस्थानावर ड्रोन उडविल्याने प्रकरण संवेदनशिल असल्याने पोलिसांचे धाबे दणाणले होते.

drone
Nashik News : अभिनेते गोविंदा त्र्यंबकराजाच्या चरणी लीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.