Nashik Ganesh Utsav : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन

Ganesh Utsav : ‘सारे विघ्न दूर सारत पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत सिडको परिसरात दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
Citizens immerse a Ganesha idol in an artificial pond at Nandini river near ITI bridge on Sunday.
Citizens immerse a Ganesha idol in an artificial pond at Nandini river near ITI bridge on Sunday.esakal
Updated on

Nashik Ganesh Utsav : ‘सारे विघ्न दूर सारत पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत सिडको परिसरात दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी (ता.७) प्राणप्रतिष्ठा झालेल्या गणरायाचे रविवारी (ता.८) भाविकांनी दीड दिवसाच्या आगमनानंतर विसर्जन केले. त्रिमूर्ती चौक परिसरातील नंदिनी नदी, आयटीआय पुलाजवळ नाशिक महापालिकेकडून कृत्रिम पाण्याचे तलाव उभारले होते. नदीमध्ये तसेच तलावात गणपती मूर्ती विसर्जन करू नये, तसेच निर्माल्य वेगळे करून देण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले. (one day Ganaraya was immersed in city )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.