Nashik Accident News : त्रिमुर्ती चौक स्कूल बसच्या अपघातात एकाचा मृत्यू

Nashik Accident : दुचाकी व शाळेच्या बस मध्ये झालेल्या भीषण अपघातात अठरा वर्षीय दुचाकी स्वाराचा अपघातात घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Mayur Dutta Gunjal
Mayur Dutta Gunjalesakal
Updated on

सिडको : सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे दुचाकी व शाळेच्या बस मध्ये झालेल्या भीषण अपघातात अठरा वर्षीय दुचाकी स्वाराचा अपघातात घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीहून दिव्या ऍडलॅब कडून त्रिमूर्ती चौक रस्त्याकडे मयूर दत्ता गुंजाळ (१८,महाले फार्म राणाप्रताप चौक सिडको) हा त्याच्या इलेक्ट्रिकल बाईक वरून जात असतांना यावेळी येथूनच जाणारी एका खासगी शाळेची बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने अपघात झाला. (One dies at Trimurti Chowk in school bus accident )

यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवासीयांनी मयूर गुंजाळ यास त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालावली. याबाबत अंबड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस अधीक तपास करीत आहेत.

Mayur Dutta Gunjal
Nashik Accident News : मजुरांचे वाहन उलटून अपघात; 1 महिला ठार, 20 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com