नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील ५४ तालुक्यांत आणि ४७ विधानसभा मतदारसंघांत सध्या एक कोटी ५४ लाख १९ हजार ९५४ मतदारांची नोंद झाली आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून समजते. (North Maharashtra Voter turnout will increase in assembly elections)
विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा बिगुल काही दिवसांतच वाजणार आहे. अशातच अविरत सुरू असणारी प्रक्रिया म्हणजेच मतदार नोंदणी पाचही जिल्ह्यांत युद्धपातळीवर सुरू आहे. मतदार यादी अपडेट करण्याच्या कामाबरोबरच नवमतदारांची लक्षणीय भर पडत आहे.
महसूल विभागाकडे हजारो अर्ज अजून प्रलंबित असून, मतदार नोंदणीचा टक्का यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासनाने सबंध महसुली विभागात मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारलेला असून, नागरिकांनी मतदान करावे, यासाठी जनजागृती सुरू केली आहे. (latest marathi news)
उत्तर महाराष्ट्राची आकडेवारी
नाशिक जिल्ह्यात २५ लाख ८१ हजार १८७ पुरुष मतदारांनी नोंद केली असून, २४ लाख एक हजार १८५ स्त्री मतदारांनी नोंद केली. तृतीयपंथीय मतदारांची संख्या ११८ आहे. धुळे जिल्ह्यात नऊ लाख २१ हजार १६१ पुरुष मतदारांनी नोंद केली असून, आठ लाख ७३ हजार ८५६ स्त्री मतदारांनी नोंद केली. तृतीयपंथीयांची संख्या ४६ आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सहा लाख ४४ हजार ५१० पुरुष मतदारांनी नोंद केली असून, सहा लाख ५२ हजार ४६७ स्त्री मतदारांनी नोंद केली. तृतीयपंथीय मतदारांची संख्या ११ आहे. जळगाव जिल्ह्यात १८ लाख ६४ हजार २४८ पुरुष मतदारांनी नोंद केली असून, १७ लाख ५२ हजार १२ स्त्री मतदारांनी नोंद केली. तृतीयपंथीयांची संख्या १४३ आहे.
महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात १९ लाख २४ हजार ५१२ पुरुष मतदारांनी नोंद केली असून, १८ लाख चार हजार २९२ स्त्री मतदारांची संख्या आहे. २०६ तृतीयपंथीय मतदारांची नोंद आहे. अशा एकूण पाचही जिल्ह्यांत ७९ लाख ३५ हजार ६१८ पुरुष मतदार असून, ७४ लाख ८३ हजार ८१२ स्त्री मतदार आहेत. ५२४ तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.