Nashik News : दीड वर्षाच्या रायबाने 6 तासात सर केला शिवनेरी किल्ला! उमराणेतील बालकाचा संकल्प पूर्ण

Nashik News : देवळा तालुक्यातील उमराणे गावातील शिवार्थ उर्फ रायबा देवरे याने किल्ल्याच्या पायथ्यापासून तब्बल ६ तास २७ मिनिटे चालून शिवाजी महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थळ गाठले.
Raiba while hiking Shivneri fort.
Raiba while hiking Shivneri fort.esakal
Updated on

वसंत रौंदळ : सकाळ वृत्तसेवा

तिसगाव : बालपणाच्या वयात अवघ्या दीड वर्षाच्या रायबाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला सर करत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनोखे अभिवादन केले. (Nashik umran child reach Shivneri Fort in 6 hours marathi news)

देवळा तालुक्यातील उमराणे गावातील शिवार्थ उर्फ रायबा देवरे याने किल्ल्याच्या पायथ्यापासून तब्बल ६ तास २७ मिनिटे चालून शिवाजी महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थळ गाठले. वडील सचिन दत्तात्रय देवरे आणि आई सेजल देवरे यांनी रायबाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचा मानस ठेवला होता.

त्यानुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा संकल्प त्यांनी पूर्ण केला. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या मूहूर्तावर जन्मलेला शिवार्थ देवरे (उर्फ रायबा) हा मुळचा देवळा तालुक्यातील उमराणे येथील आहे. या बालकाला लहानपणापासूनच शिवरायांबाबत विशेष प्रेम असल्याने वडील सचिन देवरे आणि आई सेजल देवरे यांनी रायबाला सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ला गाठला. यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन रितसर परवानगी घेतली. दरम्यान, घरी रायबाकडून नियमित चालण्याचा सराव करुन घेतला होता.

Raiba while hiking Shivneri fort.
Mumbai Coastal Road News: कोस्टल रोड टोलमुक्त ठेवा; काँग्रेसची मागणी

परतीचा प्रवास दीड तासात

आई - वडील व काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत रायबाने शिवनेरीवर चढण्यास सुरुवात केली. ६ तास २७ मिनिटात हा चिमुकला शिवनेरीवर पोहचला. त्याठिकाणी असलेल्या विशेष पथकाने देखील त्याचे स्वागत करीत त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला महाल उघडून दिला. रायबाने देखील मोठ्या अदबीने आतमध्ये प्रवेश करीत त्या जागेला मानाचा मुजरा केला. परतीचा प्रवास एक तास ३७ मिनिटात रायबाने पूर्ण केला.

"तमाम हिंदुधर्माचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा मला सार्थ अभिमान आहे. महाविद्यालयीन जीवनापासून ‘शिवचरित्र’ या विषयावर व्याख्यान देत आलो आहे. माझ्या मुलाने ही परंपरा यापुढे चालु ठेवावी व राजेंचा इतिहास आत्मसात करावा, यासाठीच त्याला बाळकडू देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे."- सचिनराजे देवरे, वडील

Raiba while hiking Shivneri fort.
Pavitra Portal Teacher Recruitment: प्रदिर्घकाळानंतर नांदगावला मिळाले 69 गुरुजी! पवित्र पोर्टलनिमित्त लागली लॉटरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.