Nashik News : महात्मा फुले, सावित्रीबाई फुले जगातील आदर्श दांपत्य. अशिक्षित पत्नीला शिक्षित करावेसे वाटणे आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष जगजाहीर आहे. फुले दांपत्याचे शिल्प मुंबई नाका येथे दिमाखात उभे राहत असल्याने नाशिकच्या वैभवात भर पडेल.
दीड वर्षापासून शिल्पाचे काम ७२ वर्षीय शिल्पकार बाळकृष्ण वसंत पांचाळ यांच्या कुडाळच्या स्टुडिओमध्ये सुरू होते. ब्रॉँझमध्ये शिल्पाचे रूपांतर करून त्याला जॉइंट आणि वेल्डिंग करून १८ सप्टेंबरला कुडाळहून सातशे किमीपर्यंतचा प्रवास करून शिल्प मुंबई नाका येथे साकारले. (Phule couple sculpture made by artist Panchal from kudal)
अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या फुले दांपत्याचा ब्राँझ धातूचा देशातील सर्वाधिक मोठा अर्धाकृती पुतळा आहे. या स्मारकाचे शनिवारी (ता. २८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. सिंधुदुर्ग (ता. कुडाळ) येथील ७२ वर्षीय शिल्पकार बाळकृष्ण वसंत पांचाळ यांनी फुले दांपत्याचा पुतळा साकारला आहे.
१९७१ सालापासून स्मारकशिल्प, व्यक्तिशिल्प घडविणारे नामवंत शिल्पकार नारायण सोनवडेकर यांच्यासोबत पांचाळ काम करीत होते. २००२ सोनवडेकर यांच्या मृत्यूनंतर पांचाळ यांनी सिंधुदुर्ग एमआयडीसीत स्वतःचा स्टुडियो सुरू केला. भारतात आणि भारताबाहेर त्यांनी अनेक शिल्प साकारली आहेत.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सातही शिल्पे त्यांनी साकारली आहेत. लोकार्पण होत असलेल्या फुले दांपत्याचा जगातील पहिला सर्वाधिक मोठा अर्धाकृती पुतळा आहे. दोन्ही पुतळ्यांची उंची १८ फूट तर, वजन साडेचौदा टनापेक्षा अधिक आहे. (latest marathi news)
ब्रॉँझ शिल्पाचे वैशिष्टे
ब्रॉँझ मटेरियलपासून बनविलेल्या शिल्पावर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही. ५ हजार वर्षांपूर्वी साकारलेली शिल्प आजही सुस्थितीत असल्याचा तसा अहवाल प्रसिद्ध आहे.
दृष्टीक्षेपात
-एकूण खर्च ४ कोटी ६८ लाख
-दोन्ही शिल्पांची उंची १८ फूट
-वजन साडेचौदा टनापेक्षा अधिक
-पुतळा साकारण्यास दीड वर्ष कालावधी
-८५ टक्के ब्राँझ, ५ टक्के कथिल, शिसे, जस्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.