सातपूर : उत्तर भारतीयांचा सर्वात मोठा धार्मिक महोत्सव असलेल्या चार दिवसीय छठ पर्वाला ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. हा महोत्सव ८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. महोत्सवानिमित्त सातपूर, अंबडमध्ये जोरदार तयारी केली आहे. तर गोदाघाटावर प्रथमच महिलांसाठी खास चेंजिंग रूम उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सूर्याला अर्घ्य देण्यासाठी आणि पूजेसाठी गोदाघाटावर नाशिक व परिसरासह ठाणे, कल्याण येथील किमान एक लाख बिहारी भाविक उपस्थित राहतील, असा दावा आयोजकांनी केला आहे. (One lakh devotees will be present for Chhath Puja at goda ghat )