Nashik News : मालेगावी स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू; मनपा आरोग्य विभाग अलर्ट

Nashik : शहरात स्वाईन फ्लूच्या शिरकाव झाला असून ६५ वर्षीय वृद्धाचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
swine flu
swine fluesakal
Updated on

Nashik News : शहरात स्वाईन फ्लूच्या शिरकाव झाला असून ६५ वर्षीय वृद्धाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली. येथील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी येथील आरोग्य केंद्रांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. येथील १४ उपकेंद्र व २ मोठ्या आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लुमुळे विशेष काळजी घेतली जात आहे. (One person died of swine flu in Malegaon )

सोयगाव भागातील आरोग्य केंद्राच्या जवळील ६५ वर्षीय वृद्धाचा २१ एप्रिलला मृत्य झाला. त्यामुळे येथील कृषीनगर भागात सोयगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने प्रत्येक घरावर जाऊन तपासणी केली. २१ एप्रिल ते आजपर्यंत शहरात स्वाईन फ्ल्युचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी शुक्रवारी (ता.२६) तत्काळ बैठक घेत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. डॉ. आहेर म्हणाल्या, की सर्दी, खोकला, अंग दुखणे, ताप, थकवा, डोकेदुखी यासारखा त्रास झाल्याने तात्काळ आपल्या नजीकच्या मनपाच्या शहरी नागरी आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत. येथील उपआरोग्य केंद्र व दवाखान्यात उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे.

swine flu
Nashik News : सुटीला रिव्‍हॉल्व्हर नेली घरी, अंमलदार सक्‍तीने निवृत्त! पोलिस आयुक्‍त कर्णिक यांच्‍याकडून कठोर कारवाई

स्वाईन फ्लू आजाराशी संबंधित आरोग्य विभागास आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. सोमवारी (ता.२९) येथे खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या स्वाईन फ्लू रुग्णाची माहीती संबंधित डॉक्टरांनी महापालिकेच्या आरोग्य विभागास कळवावी असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. आहेर यांनी केले आहे.

यांनी घ्यायची काळजी.

स्वाईन फ्लू आजारासंदर्भात वृद्ध, गरोदर महिला, उच्च रक्तदाब, दमा, लहान मुलांची काळजी घ्यावी. सर्दी, खोकला व इतर त्रास जाणवल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर उपचार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

swine flu
Nashik News : सीएसआर फंडातून जि. प. आरोग्याला 3 रुग्णवाहिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.