नाशिक : सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नर मॉडेल रोड उभारला जात असून, एकूण अठरा महिने काम चालणार आहे. यामुळे हा मार्ग सोमवार (ता. ८) पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत केवळ एकेरी वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. याबाबत वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गांचा तपशील जारी केला आहे. जुने सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नर या सुमारे तेराशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. महापालिकेतर्फे हा मार्ग मॉडेल रोड म्हणून विकसित केला जातो आहे. (Nashik One way traffic till 2025 for Model Road marathi news)
अठरा महिने टप्याटप्यात हे काम होणार आहे. रस्त्यांवरील एकेरी मार्गाने काम करण्यासाठी वाहतूक बंद ठेवली जाईल. या मार्गात वाहने उभे करण्यास प्रतिबंध केलेला आहे. वाहतूक नियंत्रण व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही बदल वाहतूक शाखेने जाहीर केले आहेत.
वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या सूचना पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन वाहने, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहनांना लागू राहणार नाही. अधिसूचनेत ऐनवेळी बदल करण्याचे अधिकार राखीव आहेत. हे बदल सोमवार (ता. ८) पासून तर ८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अमलात राहतील.
या मार्गावर असेल प्रवेश बंद-
- कॅनडा कॉर्नर सिग्नलकडून सीबीएस सिग्नलकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीस बंदी
- ठक्कर बाजारकडून मेळा बसस्थानकाकडे येणाऱ्या मार्गावर असेल प्रवेश बंद
- जलतरण तलाव सिग्नलकडून टिकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडे जाणारा मार्गात प्रवेश बंदी
- राका कॉलनी गार्डनकडून सीबीएसकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी
- ठक्कर नगरकडून कुलकर्णी गार्डनमार्गे सीबीएसकडे येणारा मार्ग बंद
- नवीन पंडित कॉलनीकडून सुश्रुत हॉस्पिटल, राका गार्डनमार्गे सीबीएसकडे जाणाऱ्या मार्गात प्रवेश बंदी
- जुनी पंडित कॉलनीकडून टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडे जाणारा मार्ग असेल बंद (latest marathi news)
असे आहेत पर्यायी मार्ग...
- कॅनडा कॉर्नरकडून जुना गंगापूर नाकामार्गे गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौक, अशोकस्तंभमार्गे सीबीएस किंवा शहरात इतर ठिकाणी जाता येईल.
- कॅनडा कॉर्नरपासून तिबेटियन मार्केट चौकातील सिग्नलवरून एम्लार्ड पार्क हॉटेल येथील सिग्नलवरून मायको सर्कल, त्र्यंबक रोडवरून पुढे त्र्यंबक नाका सिग्नल येथून शहरात इतरत्र जाता येईल.
असे आहेत एकेरी मार्ग-
- सीबीएस सिग्नलपासून कॅनडा कॉर्नरकडे जाणाऱ्या मार्गाने एकेरी वाहतूक
- कामाच्या स्वरूपानुसार टप्याटप्याने हा मार्ग एकेरी केला जाणार आहे.
-- ठेकेदाराला करावे लागणार या अटी व शर्तींचे पालन
* वाहतूक नियोजनासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडींग करावे लागणार
* प्रवेश बंद, काम चालु आहे, पर्यायी मार्गाचे दिशादर्शक, नो- पार्किंग असे सूचना फलक लावावे लागणार
* वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्याच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी दोन ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती
* टिळकवाडी सिग्नल व कॅनडा कॉर्नरवरील सिग्नल यंत्रणा व सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करावी लागणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.