Nashik Onion Garlic Price Hike : कांदा 70 तर लसूण 400 रुपये किलो; आगामी काळात दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता

Latest Marathi News : किरकोळ बाजारात कांद्याचे दर ७० रुपये किलो झाले असून, लसूणही ४०० ते ४५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे.
Onion Garlic Price Hike
Onion Garlic Price Hikeesakal
Updated on

नाशिक : गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळामुळे उन्हाळ कांद्याचे घटलेले उत्पादन आणि चालू वर्षी महिनाभर उशिरा आलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात कांद्याची आवक साधारणत: ५० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात कांद्याचे दर ७० रुपये किलो झाले असून, लसूणही ४०० ते ४५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. त्यासोबतच मेथीची जुडी ४० रुपयांना व कोथिंबीर ३० रुपयांना मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. (Onion 70 and garlic 400 rupees per kg price increase is likely to continue in future )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.